छत्र हरवलेल्या बहीण-भावांची तब्बल 7 वर्षांनंतर अनोखी भेट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2017 10:41 PM IST

छत्र हरवलेल्या बहीण-भावांची तब्बल 7 वर्षांनंतर अनोखी भेट

अद्वैत मेहता, पुणे

18 आॅगस्ट : पुण्यातील ससून रुग्णालयात आज एक अनोखी भेट झाली. ही भेट आगळी वेगळी यासाठी होती की 2 सख्ख्या भावांना त्यांची बहीण भेटली तब्बल 7 वर्षानंतर. अनाथ असलेल्या भावंडांची ही भेट संस्मरणीय ठरली. चीड आणणारी बाब म्हणजे प्रशासनाच्या गलथानपणामुळे ही भेट रखडली. या भेटीची ही करुण कहाणी...

आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर अनाथ आश्रमात वाढत असलेल्या 3 भावांपैकी सर्वात मोठी बहीण 7 वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी कोकणात अलिबागला गेली. तिचे दोन्ही भाऊ अपंग. सध्या ससूनमध्ये उपचार घेत असले तरी मंचरला संस्थेत होते.  मंचरला येण्यापूर्वी 4 वर्षे पुण्यात रिमांड होममध्ये त्यांचा मुक्काम होता.

2015 साली पुण्यात असताना ई लर्निंगच्या नावाखाली अश्लील फिल्म दाखवून मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे खळबळजनक आरोप झाले त्यातील ही दोन भावंडे पीडित आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तपासाअंती सत्य बाहेर येईल ही अपेक्षा पण पुणे शहर आणि जिल्ह्यातील या आणि इतर बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमुळे केंद्रीय महिला,बाल कल्याण मंत्री मनेका गांधी अस्वस्थ झाल्या आणि राष्ट्रवादीच्या पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण यांना त्यांनी या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या समितीचे प्रमुख केले

वंदना चव्हाण यांनी सर्व संस्थांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की, नियमानुसार सख्ख्या भावंडाना वेगळं ठेवता येत नाही.

Loading...

तरी इंग्लिश माध्यमाची शाळा नाही असं तांत्रिक चुकीचं कारण देऊन ही ताटातूट झालीय. चव्हाण यांनी तातडीने पावलं उचलत 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या बहिणीची ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या 15 आणि 16 वयाच्या भावांशी भेट घडवली. वेड्या बहिणीची वेडी माया म्हणतात...बहिणीने भावाना राख्या बांधल्या.

भाऊ ओळखतील का ?, कशी प्रतिक्रिया देतील अशा प्रश्नाचं काहूर तिच्या मनात माजलं होतं.

11 वीची परीक्षा पार पडल्यावर पुण्यात शिकायला यायची इच्छा तिने बोलून दाखवली. तेव्हा भाऊ धडधाकट होतील. हिंडते फिरते होतील अशी आशाही तिने व्यक्त केली.

वंदना चव्हाण यांनी मुलांना पुस्तके वाचायला दिली.18 वर्ष पूर्ण झाल्यावर अपंग निराधार मुलांचं काय याकडे त्यांनी लक्ष वेधताना  आफ्टर केअरचा मुद्दा अधोरेखित केला. निराधार त्यातही अपंग,मतिमंद मुलांचेप्रश्न जटील आहेत.

सेवाभावी संस्था, शसकीय रिमांड होम्स महिला बाल कल्याण समिती आपल्या परीने काम करत आहेत. पण स्थिती दयनीय आहे. केअर टेकर लोकांचा पगार अपुरा आहे,सुविधांचा अभाव आहे

अनेक वेळा मुलं मुलीं पळून जायच्या घटना घडतात.

अत्याचार,शोषण झाल्याच्या घटनाही घडतात पण काही वाईट प्रवृत्तीमुळे याचा चांगलं काम कारणाऱ्यांच्या मनोधैर्यवर परिणाम होतो. अशावेळी समाजाने ही हातभार लावणं गरजेचं आहे.

निराधार  बालकांचे प्रश्न,कायदे या बाबत लोकप्रतिनिधी,नागरिक,प्रसार माध्यमे या सर्वांनी जागरूकता दाखवली पाहिजे हेच या निमित्तानं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2017 10:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...