• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • 'सर मी पहिला आलो आहे'; आरोपीने कोर्टात दाखवला रिझल्ट, न्यायाधीशांनी खटलाच केला बंद

'सर मी पहिला आलो आहे'; आरोपीने कोर्टात दाखवला रिझल्ट, न्यायाधीशांनी खटलाच केला बंद

सामाजिक आणि मुलांच्या हिताचे निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध न्यायाधीशांनी पुन्हा एकदा मानवीय गुणांना प्राथमिकता देत शनिवारी निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  नालंदा, 28 मार्च : सामाजिक आणि तरुणाच्या हिताचे निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध न्यायाधीश मानवेंद मिश्रा यांनी पुन्हा एकदा मानवीय गुणांना प्राथमिकता देत शनिवारी निर्णय घेतला आहे. शनिवारी एक आरोपी इंटर सायन्सच्या प्रथम वर्षात उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र घेऊन न्यायालयात दाखल झाला. तो प्रमाणपत्र दाखवत न्यायाधीशांना म्हणाला की, सर मी इंटरमध्ये पहिला आलो आहे. यानंतर न्याय परिषदचे मुख्य दंडाधिकारी मानवेंद्र मिश्र यांनी मुलाला व त्याच्या आई-बाबांचं कौन्सिलिंग करीत त्याची खटल्यातून सुटका केली. आरोपी हा नालंदा ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणारा आहे. त्याच्या विरुद्ध 2019 मध्ये आपल्या नातेवाईकांसोबत मिळून मारहाण करणे आणि छेडछाड करण्याचा आरोप होता. आरोपी मुलगा शनिवारी इंटर सायन्सचा रिजल्ट आल्यानंतर प्रमाणपत्रासह कोर्टात हजर झाला. विद्यार्थ्याने इटंर सायन्समध्ये 69 टक्के गुण मिळवले आहेत. हे ही वाचा-मुंबईत आजोबाकडून नात आणि मुलीवर वारंवार बलात्कार, जन्मठेपेची शिक्षा न्यायाधीशांनी मुलाची प्रतिभा पाहून केस बंद केली न्यायाधीशांनी किशोरवयीन मुलाला पुढील शिक्षणाबाबत विचारपूस केली. सोबतच त्याच्या आई-बाबांकडूनही मुलाच्या भविष्याबाबत माहिती घेतली. मुलाने आणि त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं की, तो भविष्यात इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊ इच्छितो. त्यासाठी त्याला बिहारमधून बाहेर जायची इच्छा आहे. अशा परिस्थितीत कोर्टात जर खटला सुरू झाला तर त्याना शिक्षण सोडून वारंवार न्यायालयात यावं लागेल. त्यामुळे मुलाने आणि त्याच्या पालकांनी न्यायालयात खटला संपवण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी मुलाची प्रतिभा पाहून खटल्याची पुढील कारवाई बंद केली. खटला सुरू ठेवल्यास मुलाच्या अभ्यासात अडचण न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावला, यावेळी ते म्हणाले की, खटला सुरू ठेवला तर मुलाच्या अभ्यासात अडचणी उभ्या राहतील. अशात मुलाच्या हितासाठी खटला जारी ठेवणं योग्य राहणार नाही. मुलाची योग्य देखभाल आणि संरक्षणासाठी कोर्टाने खटल्यातून त्याची सुटका केली आहे. ते पुढे म्हणाले की, किशोर वयात एक स्वभाव असतो त्यात कधीही तो आपल्या कुटुंबात वाद-भांडणं पाहतो तर तो आई-वडील किंवा कुटुंबाच्या बचावासाठी स्वत: पुढे येतो.
  Published by:Meenal Gangurde
  First published: