राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पण...

राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पण...

12 वर्षांनंतर एकत्र आल्यानंतरही दोन्ही नेत्यांमधील दरी अजूनही कायम आहे.

  • Share this:

23 जून :  तब्बल 12 वर्षांनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. पण, 12 वर्षांनंतर एकत्र आल्यानंतरही दोन्ही नेत्यांमधील दरी अजूनही कायम आहे. व्यासपीठावर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दोन खुर्च्यांचं अंतर होतं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमीपूजनचं.

या ठिकाणी ठाकरे आणि राणे हे दोघेहीजण तब्बल 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले. पण या नेत्यांमधील अंतर काही दूर झाले नाही. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये दोन खुर्च्यांचं अंतर होतं. राणेंच्या शेजारी सेनेचे नेते अनंत गीते बसले होते. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे बसल्या होत्या. उद्धव यांच्या दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. संपूर्ण कार्यक्रमात उद्धव ठाकरे राणे यांच्याशी बोलण्याचा असा कोणताही क्षण आला नाही.

 

दरम्यान, या कार्यक्रमाआधी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी रंगली. महामार्गाचं श्रेय घेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 05:42 PM IST

ताज्या बातम्या