आम्ही निघालो आमच्या गावा...

आम्ही निघालो आमच्या गावा...

सिंधुदुर्गातल्या अत्यंत स्वच्छ अशा मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाच्या 61 पिल्लांना स्थानिक मच्छीमारांनी जीवदान दिलंय.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 26 मार्च : सिंधुदुर्गातल्या अत्यंत स्वच्छ अशा मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर  ऑलिव्ह रिडले कासवाच्या 61 पिल्लांना स्थानिक मच्छीमारांनी जीवदान दिलंय.

मोचेमाड समुद्रकिनारी २७ जानेवारीला ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १०१ अंडी येथील कासवमित्र श्रीधर कोचरेकर यांनी वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  संरक्षित केली होती. यापैकी आज ६१ पिल्ले अंडयातून बाहेर आली.  वनरक्षक आणि येथील स्थानिकांच्या उपस्थितीत आज या पिल्लांना मोचेमाड समुद्रात सोडण्यात आलं.

या समुद्रकिनारी अजून दुर्मिळ ओलिव्ह रिडले प्रजातीची १५ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या महिन्यात ओलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लाना पाहण्याची पर्यटकांना पर्वणीच असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 11:25 PM IST

ताज्या बातम्या