आंबोली घाटातल्या 'त्या' मृतदेहाचं गुढ उकललं ; अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला शिक्षकाचा काटा !

आंबोली घाटातल्या 'त्या' मृतदेहाचं गुढ उकललं ; अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला शिक्षकाचा काटा !

आंबोली घाटात काही दिवसांपूर्वी बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकललंय. तो मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचे शिक्षक विजयकुमार गुरव यांचाच असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय. आपल्या प्रियकरासोबत पळून जाता यावं, यासाठी विजयकुमार गुरव यांच्या पत्नीनेच त्यांचा खून केला आणि तो मृतदेह आंबोली घाटात आणून फेकून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.

  • Share this:

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

28 नोव्हेंबर, सांवतवाडी : आंबोली घाटात काही दिवसांपूर्वी बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचं गुढ उकललंय. तो मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचे शिक्षक विजयकुमार गुरव यांचाच असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय. आपल्या प्रियकरासोबत पळून जाता यावं, यासाठी विजयकुमार गुरव यांच्या पत्नीनेच त्यांचा खून केला आणि तो मृतदेह आंबोली घाटात आणून फेकून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. एवढंच नाहीतर आरोपी पत्नीने घरातून पळून जाताना 50 तोळे सोनंही लंपास केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला मुंबईतून अटक केलीय. न्यायालयाने या दोन्ही आरोपीना 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिलीय.

याबाबतची सविस्तर हकीगत अशी की, सावंतवाडी पोलिसांना गेल्या 11 नोव्हेंबर रोजी आंबोली घाटाच्या दरीत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता.पण मृतदेह इतका छिन्नविछीन्न होता की, त्याची ओळखच पटत नव्हती. म्हणून मग पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरात नजीकच्या काळात दाखल झालेल्या काही मिसिंग कल्पेंटची चौकशी सुरू केली असता त्यांना गडहिंग्लज मधल्या भडगाव गावातले शिक्षक विजयकुमार गुरव चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे मिसिंगची ही तक्रार त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव म्हणजेच आरोपीनेच दिली होती. खरंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अडचणी येत होत्या. पण विजयकुमार गुरव यांच्या मुलाने मृतदेहाच्या हातात बांधलेल्या धाग्यावरुन तो आपल्याच वडिलांचा असल्याचं पोलीसाना सांगितलं होतं. म्हणून मग पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी मृतदेहाच्या डिएनएचे नमुने घेऊन ते पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवून दिले.

दरम्यानच्या काळात पोलिसानी भडगाव गावातून माहिती जमा करण्यास सुरुवात केली, याच चौकशीदरम्यान, विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी हिचे त्याच गावात पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या सुरेश चोथेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. विजयकुमार आपल्या पत्नी आणि मुलांचा भरपूर छळ करत होता अशी माहितीही गावातून मिळत होती. या छळाला कंटाळूनच जयलक्ष्मीने सुरेश चोथेशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. या प्रेमातूनच मग जयलक्ष्मीने आपले काही दागिने सुरेश चोथेच्या हवालीही केले होते यावरूनच जयकुमार आणि त्याच्या पत्नीत आणखी वाद सुरु झाले. एक दिवस जयलक्ष्मीने ही कटकट कायमची संपवण्याचं ठरवलं आणि संधी साधून विजयकुमारला एका रात्री भरपूर दारु पाजली. दारुच्या नशेत विजयकुमार पुरता बुडाल्याचं लक्षात येताच जयलक्ष्मीने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला त्यातच विजयकुमारचा प्राण गेला. मग प्रश्न आला मृतदेहाचं काय करायचं. म्हणून मग जयलक्ष्मीने विजयकुमारच्याच गाडीत त्याचा मृतदेह टाकला. आणि आपल्या प्रियकराला सोबत घेऊन ते दोघे थेट आंबोली घाटात गेले. आणि तिथेच त्यांनी आंबोलीच्या कावळेसाद पॉईंटवरून विजयकुमार गुरव यांचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला.

पुढे, 27 नोव्हेंबरला पोलिसांना डीएनए रिपोर्ट मिळाला. त्यात हा मृतदेह विजयकुमारचाच असल्याचं निष्पन्न झालं होतं. दरम्यानच्या काळात जयलक्ष्मी आणि सुरेश दोघेही गावातून बेपत्ता झाल्यामुळे पोलीसही त्यांच्या मागावर होतेच. अखेर 27 च्या संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी दोघानाही नालासोपारा मधून ताब्यात घेतलं. 28 नोव्हेंबरला सावंतवाडी न्यायालयात हजर केलं. न्यायाधिशांनी आरोपीना पाच डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमारच्या मुलानाही या प्रेमसंबंधांची कल्पना होती. मात्र विजयकुमारच्या छळाला कंटाळून एक प्रकारे त्यांची या संबंधांना मूक संमतीच होती. सिंधुदुर्ग पोलीस आता या गुन्ह्याचा आणखी तपास करतायत.

 

First published: November 28, 2017, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading