मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा झटका, निकटवर्तीय राजन तेली यांचा पराभव

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा झटका, निकटवर्तीय राजन तेली यांचा पराभव

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत राणेंना धक्का दिला आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत राणेंना धक्का दिला आहे.

Sindhudurg District bank election result : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवत जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं आहे मात्र, असे असताना भाजपला एक झटका सुद्धा बसला आहे.

  • Published by:  Sunil Desale

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल (Sindhudurg District Bank Election Result) आता समोर आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या (BJP wins maximum seats) आहेत. महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका असून भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मात्र, असे असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक झटका बसला आहे. कारण, जिल्हा बँक अध्यक्ष पदाचे दावेदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे निकटवर्तीय राजन तेली (Rajan Teli) यांचा पराभव झाला आहे.

कणकवली येथून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी भाजपच्या राजन तेली यांचा पराभव केला आहे. राजन तेली हे नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच राजन तेली यांचा पराभव हा नारायण राणे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

वाचा : Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने मारली बाजी

सिद्धीविनायक पॅनेल भाजपा विजयी

1. मनीष दळवी - वेंगुर्ला

2. दिलीप रावराणे - वैभववाडी

3. प्रकाश गोडस - देवगड

4. विठ्ठल देसाई - कणकवली

5. अतुल काळशेकर : पणन विभाग

6. महेश सारंग : दुग्ध विभाग

7. संदीप परब

8. समीर सावंत : वैयक्तिक मतदार संघ

9. गजानन गावडे : मजूर विभाग

10. प्रज्ञा ढवन : महिला विभाग

11. अस्मिता बांदेकर : महिल विभाग

(विठ्ठल देसाई आणि सतिश सावंत यांच्यात टाई झाली होती. अखेर विठ्ठल देसाई यांचा विजयी झाला)

महाविकास आघाडी

1. व्हिक्टर डॅाटस : मालवण

2.विद्याप्रसाद बांदेकर : कुडाळ

3.विद्याधर परब : सावंतवाडी

4.गणपत देसाई : दोडामार्ग

5. सुशांत नाईक : कणकवली

सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते

या निवडणूक निकालात शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. मात्र, नंतर भाजपचे विठ्ठल देसाई यांनी विजय मिळवला. विठ्ठल देसाई यांच्या विजयामुळे भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे तर महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका आहे.

दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी ठरवण्यात आला. चिठ्ठी टाकून भाजपचे विठ्ठल देसाई यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. विद्यमान अध्यक्षांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.

किती टक्के झाले मतदान ?

या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67 % मतदान झाले असून तालुकानिहाय कुडाळ- 213 पैकी 213 - 100 % , वेंगुर्ले - 96 पैकी 91 - 94.79 %, सावंतवाडी - 212 पैकी 211 - 99.52 %, वैभववाडी 54 पैकी 13 - 98 %, कणकवली - 165 पैकी 161 - 97.57 %, मालवण - 110 पैकी 110 - 100 % दोडामार्ग - 48 पैकी 48 - 100 %, देवगड - 98 % मतदान झाले.

First published:

Tags: BJP, Shiv sena, Sindhudurg