मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /साध्या हिरो होंडाची झाली सिंघम बाईक, वाचा तरुणांचा भन्नाट प्रयोग

साध्या हिरो होंडाची झाली सिंघम बाईक, वाचा तरुणांचा भन्नाट प्रयोग

या बाईकला त्यांनी 'सिंघम बाईक' असं नाव दिलं असून सध्या तरुणांमध्ये या बाईकची जोरदार क्रेझ आहे.

या बाईकला त्यांनी 'सिंघम बाईक' असं नाव दिलं असून सध्या तरुणांमध्ये या बाईकची जोरदार क्रेझ आहे.

या बाईकला त्यांनी 'सिंघम बाईक' असं नाव दिलं असून सध्या तरुणांमध्ये या बाईकची जोरदार क्रेझ आहे.

  सिंधुदुर्ग, 23 डिसेंबर : बाईक चालवताना आपण सिंहाच्या पाठीवर बसून चाललो आहोत असा भन्नाट अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर सिंधुदुर्गातल्या म्हापण गावात जायला हवं. इथल्या पुंडलीक केळुसकर आणि नाना केळुसकर बंधूंनी जुन्या हिरो होंडा पॅशन मोटरसायकलला गर्जना करणाऱ्या सिंहाचा लूक दिला आहे. या बाईकला त्यांनी 'सिंघम बाईक' असं नाव दिलं असून सध्या तरुणांमध्ये या बाईकची जोरदार क्रेझ आहे.

  कशी आकाराला आली सिंघम बाईक

  म्हापण गावात पुंडलीक केळुसकर आणि नाना केळुसकर हे बंधू छोटसं हॉटेल चालवतात. दरवर्षी गणेश चतुर्थीला आपल्या गणपतीजवळ आकर्षक देखावे आणि अनोखी सजावट करण्याचा त्यांना छंद आहे. याच छंदातून पुंडलीक केळुसकर यांना ही कल्पना सूचली. ही कल्पना सूचण्याचं आणखी एक कारण ते सांगतात की बुलेट घेणं सर्वच तरुणाना शक्य होत नाही. आणि होंडा बाईक शेजारून एखादी  बुलेट गेली की होंडावाला खट्टू होतो. तो होउ नये आणि त्यालाही आपली मोटरसायकल म्हणजे काहीतरी विशेष आहे हे दाखवता यावं त्यातूनही हे त्यांच्या डोक्यात आलं.

  इतर बातम्या - या 4 रेल्वे स्थानकावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

  यासाठी त्यांनी त्यांच्याजवळची जुनी हिरो होंडा पॅशन मोटरसायकल निवडली. सिंहाचा लूक देण्यासाठी  फायबर साठी मोल्ड तयार करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. हा मोल्ड आधी तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती त्याना आवश्यक होती . ही माती बाईकच्या तोंडावर , सीटवर आणि मागे लावून त्यांनी आधी साचे तयार केले . जे साचे तयार करायला त्यांना 22 दिवस लागले. साचे तयार झाल्यानंतर त्यानी फायबरमधून हे मोल्ड काढण्याचं ठरवलं. कारण फायबर मटेरियल वजनाला हलकं असतं. आणि या लूकमुळे बाईकचं वजनही जास्त वाढू नये याची काळजी त्यांना घ्यायची होती.

  इतर बातम्या - अमृता फडणवीसांना राहुल गांधींसारखीच 'शिक्षा', पिंपरीमध्ये वातावरण तापणार

  सिंहाच्या आकाराचे फायबर मोल्ड काढल्यानंतर त्यांचं बाईकवरचं फिटिंग आणि रंगसंगती हे दुसरं आव्हान त्यांच्यासमोर होतं. पण त्यासाठी त्याना बाईकचे दिवे आधी बदलावे लागले. हेडलाईट आणि इंडिकेटर ऐवजी दोन वेगळे वेगळे  लाईट्स तयार करून ते फिट करावे लागले. या फायबरच्या सिंहाला रंगही अगदी रियलीस्टीक वाटावा असा निवडण्यात आला आणि सतत आठ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर बाईकचा हा लूक तयार झाला. त्यासाठी 55 हजार खर्च आला. या नव्या लूकमुळे बाईकचं वजन 35 किलोंनी वाढलं आहे. ही बाईक आता सेन्सरवर सुरू आणि बंद कशी होईल यासाठी केळुसकर बंधू प्रयत्न करीत असून यात लवकरच ते नवे बदल करणार आहेत.

  इतर बातम्या - 23व्या वर्षीच कमवतो 89 लाख, हे काम शिकण्यासाठी तुम्ही कोणाची वाट पाहताय?

  First published:
  top videos