S M L

आवाज घुमणारच !, हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

या गणेश विसर्जन आणि नवरात्रीचा दरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्यानं घुमणार हे निश्चित झालंय.

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2017 06:21 PM IST

आवाज घुमणारच !, हायकोर्टाच्या निर्बंधाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

विवेक कुलकर्णी, मुंबई

04 सप्टेंबर : शांतता क्षेत्राच्या मुद्यावर राज्य सरकार आणि मुंबई हायकोर्ट आमने सामने आल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.  सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा दिलासा देत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या गणेश विसर्जन आणि नवरात्रीचा दरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्यानं घुमणार हे निश्चित झालंय. याबद्दलचा हा स्पशेल रिपोर्ट

सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने उद्या होणारं गणेश विसर्जन आणि याच महिन्यात येणाऱ्या नवरात्री दरम्यान लाऊडस्पीकर वापरासाठी येणारा असणारा शांतता क्षेत्राचा अडथळा आता दूर झाला आहे. गेल्या शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने पूर्वीची शांतता क्षेत्र कायम राहतील असं म्हणत राज्य सरकारनं शांतता क्षेत्र राहिली नसल्याचा केलेला दावा फोल ठरवला होता. मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय मान केल्यास मुंबईत ७५ टक्के भाग शांतता क्षेत्र होईल आणि गणेशोत्सव आणि नवरात्र साजरं करणं अवघड होईल असं म्हणत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आजच धाव घेतली आणि त्यावर लगेचच आज सुनावणी झाली.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनी प्रदूषण कायद्यात केलेल्या बदलानुसार राज्य सरकारने शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार आपला असून आता शहरात कुठेही शांतता क्षेत्र नसल्याचं १० आॅगस्टला कोर्टात म्हटलं होतं. आवाज फाऊंडेशनसहीत इतर संघटनांनी यावर कोर्टाकडे आक्षेप नोंदवला होता. जोवर सरकार या बदलाचा अर्ज आपल्याकडे करत नाही तोवर पूर्वीची शांतता क्षेत्रं कायम राहतील असं कोर्टाने म्हटल्यावर राज्य सरकारने न्यायमुर्ती अभय ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत खंडपीठ बदलण्याचा अर्ज केला. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हे प्रकरण न्यायमूर्ती अभय ओकांकडे काढून पुन्हा नव्या खंडपीठाची निर्मिती करत अभय ओकांकडेच देण्यात आलं. नव्या खंडपीठाने पूर्वीची शांतता क्षेत्र कायम राहतील असा आदेश दिल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता उत्सवांदरम्यान लाऊडस्पीकर लावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 06:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close