इस्लामाबाद, 05 जानेवारी : पाकिस्तानच्या (Pakistan) पेशावरमध्ये (Peshawar) एका शीख युवकाची हत्या करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परविंदर सिंग असे या युवकाचे नाव आहे. परविंदरचे पुढच्या आठवड्यात लग्न होणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी पेशावर येथे गेला होता, तेथेच काही अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केली.
पेशावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर सिंग हा शांगलाचा रहिवासी होता आणि तो लग्नाच्या तयारीसाठी पेशावरला गेला होता.
गुरुद्वारावर केला दगडफेक
यापूर्वी पाकिस्तानमध्ये लोकांच्या जमावाने गुरुद्वारावर हल्ला केला आणि शीख भाविकांवर दगडफेक केली होती. यानंतर एका शीख किशोरवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीच्या कुटूंबाच्या नातेवाईकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी गुरुद्वारा जन्मस्थानक ननकाना साहिब बाहेर निदर्शने केली.
#Breaking- पाकिस्तान के पेशावर में एक सिख लड़के की हत्या@Gayatrisharma24 pic.twitter.com/wGA3PNMRnH
— News18 India (@News18India) January 5, 2020
गुरुद्वारा ननकाना साहिब लाहोरजवळ आहे ज्याला गुरुद्वारा जन्मस्थान म्हणून देखील ओळखले जाते. हे शीखांचे पहिले गुरु नानक देव यांचे जन्मस्थान आहे. वृत्तानुसार शुक्रवारी गुरुवारी हिंसक जमावाने हल्ला करून दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.
ननकाना साहिब घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि तेथील शीख समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास पाकिस्तान सरकारने सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan