Home /News /news /

Shukra Gochar 2022: या राशीच्या लोकांना खूप सतर्क राहण्याचे दिवस; शुक्राची बदललेली स्थिती आणेल अडचणीत

Shukra Gochar 2022: या राशीच्या लोकांना खूप सतर्क राहण्याचे दिवस; शुक्राची बदललेली स्थिती आणेल अडचणीत

शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलेल, तर काही राशीच्या लोकांसाठी नवीन आव्हाने येतील. शुक्राच्या नकारात्मक प्रभावाने काही राशीच्या लोकांवर विपरीत परिणाम दिसून येतील, त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 21 मे : शुक्राचे राशी परिवर्तन (Shukra Rashi Parivartan) 23 मे रोजी होणार आहे. शुक्रदेव आता मेष राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राला भौतिक सुख, विलासी जीवन, प्रेम इत्यादींचे प्रतीक मानले जाते. शुक्र 23 मे रोजी रात्री 08:39 वाजता मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलेल, तर काही राशीच्या लोकांसाठी नवीन आव्हाने येतील. शुक्राच्या (Shukra Gochar) सकारात्मक प्रभावाने उत्पन्नात वाढ, नोकरीत बढती, व्यवसायात प्रगती, प्रेमविवाह, प्रेमसंबंधात वाढ इत्यादी गोष्टी घडून येतात, तर शुक्राच्या नकारात्मक प्रभावाने त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. शुक्राच्या नकारात्मक प्रभावामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते आणि उधळपट्टीही वाढू शकते. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्राच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, त्याविषयी जाणून घेऊया. शुक्र संक्रमणाचा कोणत्या राशींवर प्रभाव - वृषभ - शुक्राच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांची उधळपट्टी वाढू शकते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. खर्च वाढल्याने बचतीवर परिणाम होईल. शुक्राचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या. कन्या - मेष राशीतील शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक संबंधांवर परिणाम करू शकते. या काळात तुमच्या वडिलांची तब्येत बिघडू शकते, त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आईशी कोणत्याही विषयावर वाद घालू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर आईशी संबंध बिघडू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल संदिग्धता असेल तर स्वतःच स्पष्ट करा, अन्यथा गैरसमजामुळे अडचणी वाढू शकतात. हे वाचा - Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला वृश्चिक - शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना करिअर किंवा व्यवसायात सावध राहण्याची परिस्थिती निर्माण करत आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्यासमोर आव्हाने वाढू शकतात. तुमचे नुकसान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित निर्णयांमध्ये गोपनीयता ठेवा. हे वाचा - Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची मीन - शुक्राच्या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांना कौटुंबिक संबंधांमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात. कुटुंबातील सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा पडू शकतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. या काळात उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल. गैरसमजामुळे वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या