S M L

किटकनाशक कंपनीचे अध्यक्ष राजू श्राफ यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूंची क्रूर थट्टा

राज्यातला एकाही शेतकऱ्याचा मृत्यू हा किटकनाशकांच्या विषबाधेमुळे झाला नसून ह्या शेतकऱ्यांचा मृत्यू हे विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे झालीत, अशी मुक्ताफळं देशातील किटकनाशके निर्मात्यांची संघटना क्राँप फेडरेशन आँफ इंडियाचे CCFI अध्यक्ष राजु श्राफ यांनी उधळलीत.

Chandrakant Funde | Updated On: Nov 11, 2017 11:28 AM IST

किटकनाशक कंपनीचे अध्यक्ष राजू श्राफ यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूंची क्रूर थट्टा

नागपूर, 11 नोव्हेंबर : राज्यातला एकाही शेतकऱ्याचा मृत्यू हा किटकनाशकांच्या विषबाधेमुळे झाला नसून ह्या शेतकऱ्यांचा मृत्यू हे विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे झालीत, अशी मुक्ताफळं देशातील किटकनाशके निर्मात्यांची संघटना क्राँप फेडरेशन आँफ इंडियाचे CCFI अध्यक्ष राजु श्राफ यांनी उधळलीत. भारतातील सर्वात मोठी किटकनाशक तयार करणारी कंपनी युपीएलचे चेअरमन श्राँफ यांनी किटकनाशक फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेतून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पुरावा कुणी सादर केला तर त्या व्यक्तीला 50 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही न्यूज - १८ लोकमत वर केली आहे.

यवतमाळातील १९ शेतकऱ्यांच्या पोस्टमाँर्टमचा अहवाल आपण अनाफिशिअली मिळवला त्यात दहा लोक विष पिल्यामुळे आणि पाच ते सहा लोक हे अति दारु पिल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप करून श्राँफ यांनी एकप्रकारे मयत शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच केलीय. परदेशातून कोट्यवधी रुपयांची देणगी घेत असलेल्या पर्यावरणवादी संघटना जाणून बुजुन किटकनाशक उद्योगाला बदनाम करत असल्याचही श्राँफ म्हणाले.दरम्यान, राजू श्राँफ यांच्या या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले आहे. जर राज्य सरकारने शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या किटकनाशक कंपन्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचही किशोऱ तिवारी यांनी जाहीर केलं.

किटकनाशक कंपन्याचे प्रमुख श्राँफ यांच्याकडे मृत शेतकऱ्यांचे पोस्टमार्टम अहवाल पोहचतो याचाच अर्थ शासकीय अधिकारी हे किटकनाशक कंपन्यांसाठी दलाली करत असल्याच सिद्ध होत असल्याच किशोर तिवारी म्हणाले. मृत्यु झालेले बहुतांश शेतकरी हे निर्वसनी असल्याचे तिवारी म्हणाले. जर श्राँफ यांच्या म्हणन्यानुसार जर कुणी किटकनाशकांच्या विषबाधेमुळे कुणाचा मृत्यू होत नसेल तर मग किटकनाशके कायदा कशाला असा सवाल उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 11:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close