News18 Lokmat

श्रीगोंद्यातील पेडगावात दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला ठार

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक वृद्ध महिला ठार झालीय. सुशीला जगन्नाथ धगाटे असं मरण पावलेल्या महिलेचं नावं आहे. दरोड्यात महिलेचा मृत्यू झाल्याने श्रीगोंदा परिसरात प्रचंड खळबळ माजलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 01:45 PM IST

श्रीगोंद्यातील पेडगावात दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला ठार

अहमदनगर, 28 जुलै : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक वृद्ध महिला ठार झालीय. सुशीला जगन्नाथ धगाटे असं मरण पावलेल्या महिलेचं नावं आहे. या महिलेने चोरट्यांना विरोध केल्यानं चोरट्यांनी तिला बेदम मारहाण केलीय. त्यात सुशीला धगाटे जागीच ठार झाल्यात. यावेळी चोरट्यांनी घरातला ऐवजही लंपास केलाय. या घटनेनंतर चोरट्यांनी बाजूच्या कार्यकारी सेवा सोसायटीतही चोरीचा प्रयत्न केला. दरम्यान, चोरांचा शोध घेण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलंय. दरोड्यात महिलेचा मृत्यू झाल्याने श्रीगोंदा परिसरात प्रचंड खळबळ माजलीय. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...