मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

shraddha walker case : श्रद्धाकडे होती खास 'NEWS', हत्येच्या आधीचे चॅटमध्ये उघड

shraddha walker case : श्रद्धाकडे होती खास 'NEWS', हत्येच्या आधीचे चॅटमध्ये उघड

 श्रद्धाने मित्राचा कोणताच मेसेज केला नाही आणि त्यानतंर श्रद्धाचा मोबाईल फोन देखील बंद झाला होता. तो शेवटपर्यंत सुरुच झाला नाही आणि...

श्रद्धाने मित्राचा कोणताच मेसेज केला नाही आणि त्यानतंर श्रद्धाचा मोबाईल फोन देखील बंद झाला होता. तो शेवटपर्यंत सुरुच झाला नाही आणि...

श्रद्धाने मित्राचा कोणताच मेसेज केला नाही आणि त्यानतंर श्रद्धाचा मोबाईल फोन देखील बंद झाला होता. तो शेवटपर्यंत सुरुच झाला नाही आणि...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे अवघा देश सुन्न झाला. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. अशातच आता श्रद्धा आणि तिच्या मित्रामध्ये झालेला संवाद पुढे आला आहे. यामध्ये श्रद्धाने आपल्याकडे खास 'NEWS' असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे, हत्येच्या काही तासा आधीचे श्रद्धा वाळकरचे चॅट आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहे. विकृत प्रियकर आफताबची सखोल चौकशी सुरू आहे. 18 मेच्या रात्री आफताबने श्रद्धाची हत्या केली पण हत्येच्या काही तास आधीपर्यंत श्रद्धा आपल्या मित्राशी चॅटिंग करत होती. तिच्याकडे काही तरी “गूड न्यूज” होती असं श्रद्धाने मित्राला सांगितलं.

याचा अर्थ श्रद्धा हत्येच्या आधी खुश होती. आफताब आणि तिच्यात काही वाद नव्हता हे तिच्या चॅटवरुन स्पष्ट होतंय. एवढंच काय की, मित्राने 2 तासाने रिप्लाय केला पण तरी श्रद्धाने रिप्लाय केलेल्या मेसेजवरुन लक्षात येते की, ती आनंदात होती आणि कोणत्या तरी कामात व्यस्त होती पण यानंतर श्रद्धाची हत्या केली गेली. १८ मे च्या रात्री ९ च्या सुमारास श्रद्धाची हत्या केली गेली त्या आधी दुपारी ४.३४ मिनिटांनी श्रद्धा आपल्या मित्रासोबत मोबाइलवरून चॅट करत होती.

श्रद्धा आणि तिच्या मित्रामध्ये चॅट

- दुपारी ४ वाजून ३४ मिनिटे

श्रद्धा - Dude, I have got news

श्रद्धाने केलेल्या या मॅसेजला मित्राने लगेच रिप्लाय केला नाही. पण अचानक तिच्या मित्राने ६ वाजून २९ मिनिटाने रिप्लाय केला.

श्रद्धाचा मित्र - what?

पण लगेच श्रद्धाने उत्तर दिले यावरुनही लक्षात येते की, श्रद्धा आनंदात होती.

सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटे

श्रद्धा - I got super busy with something

याचा अर्थ श्रद्धा कोणत्या तरी कामात व्यस्त होती

पण यानंतर श्रद्धाने मित्राचा कोणताच मेसेज केला नाही आणि त्यानतंर श्रद्धाचा मोबाईल फोन देखील बंद झाला होता. तो शेवटपर्यंत सुरुच झाला नाही आणि ६ महिन्यांनी श्रद्धाची हत्या झाल्याचे समोर आले.

(shraddha walker case : एक होती श्रद्धा वालकर, कॉलेजमधला जुना VIDEO आला समोर)

दरम्यान,  श्रद्धा वालकर हिचं एक जुनं पत्र समोर आलं आहे. ज्यात तिने आफताब आपली हत्या करणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र श्रद्धाने लिहिलं होतं आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिने आफताबने तिची हत्या करणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तिने हे पत्र/तक्रार महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. तक्रार पत्रात श्रद्धाने आफताबकडून केलं जाणारं ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला यासह अनेक गंभीर आरोप केले होते.

(विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले; नांदेडमधील तरुणाचा भयानक शेवट)

या पत्रात लिहिलं आहे की, 'आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे. मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे', असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे.

पुढे या पत्रात लिहिलं आहे की, 'आफताबच्या पालकांना हेदेखील माहिती आहे की, 'आम्ही एकत्र राहातो. ते अनेकदा इथे येतात. मी आजपर्यंत त्याच्यासोबत राहिले कारण आम्ही लग्न करणार होतो आणि त्याच्या कुटुंबीयांचाही यासाठी पाठिंबा होता. यापुढे मला त्याच्यासोबत राहायचं नाही. मात्र, तो मला सतत मारण्याची धमकी देत आहे', असं या पत्रात म्हटलं आहे.

First published: