S M L

तुम्ही तुमच्या पाल्याला असं तर शिकवत नाही ना ?

सोशलमीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. यात एका चिमुरडीची शिकवणी सुरू आहे. या व्हिडिओत सुरुवातीपासून ती प्रचंड भेदरलेली आणि रडलेली दिसत आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2017 07:42 PM IST

तुम्ही तुमच्या पाल्याला असं तर शिकवत नाही ना ?

19 आॅगस्ट : आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करणे ही प्रत्येक आई-वडिलांची जबाबदारी असते. आपल्या पाल्याला आपण कसं शिकवावं हे सर्व काही पालकांवर अवलंबून असतं. पण, एका छोट्याशा चिमुरडीला दमदाटी करून शिकवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही चिमुरडी प्रेमाने शिकवा अशी विनवणीही करतेय.

"छडी लागे छम छम..." हे बालगीत लहानपणी आपण सर्वांनीच लहानपणी शाळेत अनुभवलं असेल. पण, काळ जसा बदलला याला मर्यादाही यायला लागल्यात. शाळेतच नाहीतर घरीही आपल्या लाडक्या मुला-मुलींना शिकवण्याची जबाबदारी पालकांवर अालीये.

सोशलमीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. यात एका चिमुरडीची शिकवणी सुरू आहे. या व्हिडिओत सुरुवातीपासून ती प्रचंड भेदरलेली आणि रडलेली दिसत आहे. एक..दोन..तीन..चार  आणि पाच पर्यंत एवढीचं आकडेमोड तिच्याकडून पाठ करून घेतली जात आहे. पण जेव्हा ती एक..दोन..तीन..चार पर्यंत म्हणते परत तिला दमदाटी करून पहिल्यापासून वाचण्यास सांगितलं जातं. तर ती गोंधळून जाते आणि दोनला पाच म्हणते, ती इतकी घाबरते की, "मला प्रेमाने शिकवा, मी सांगते अशी गयावया करते."  ती इतकी भेदरलेली असते की तिच्या तोंडातून व्यवस्थित शब्द ही बाहेर पडत नाही. पण, समोरची महिला तिचं नाव ऐकत नाही. दोनला जेव्हा ती चुकून पाच म्हणते तर या चिमुरडीच्या तोंडात जोरात चापट मारते. ती चिमुरडी रडते, घाबरते आणि रडतरडतच एक ते पाचपर्यंत म्हणते.

या वरुन एकच प्रश्न निर्माण होतो की, खरंच ही शिकवण्याची पद्धत आहे का ?, अशी दमदाटी करून मुलं शिकतील का ?,  प्रेमाने जर कुणी बोललं तर रानचं पाखरूही जवळ येतं असं म्हणतात. ही तर तुमचीच मुलं आहे. मग त्यांना अशी दमदाटी करून मारहाण करुन शिकवणं कुठंपर्यंत योग्य आहे हे तुम्हीच ठरवलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 06:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close