चाकूचा धाक दाखवून लुटत होता, दुकानदारानं चोराला घडवली अद्दल, पाहा VIDEO

चाकूचा धाक दाखवून लुटत होता, दुकानदारानं चोराला घडवली अद्दल, पाहा VIDEO

या दुकानदारानं बॉलिवूड स्टाईलनं चोराला पळवून लावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण अद्दल घडवण्यासाठी मिरची पावडर डोळ्यात टाकल्याचे सिन पाहात असतो. असा प्रकार खरोखरच घडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूकेमध्ये एका दुकानात चोर जेव्हा चोरी करण्यासाठी घुसला तेव्हा त्याला अद्दल घडवण्यासाठी दुकानदारानं नामी शक्कल लढवली आणि त्या चोराला धडा शिकवला. हा चोर दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत होता. सर्व सामान आणि पैसे लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या या चोराला दुकानदारानं मिरची पावडर डोळ्यात टाकून पळताभुई थोडी केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता चोराला कशा प्रकारे दुकानदारानं अद्दल घडवली आहे.दुकानदारानं मिरची पावडर टाकल्यावर हा चोर डोळे चोळत पळून गेला. सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे दुकानदारानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या चोराचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुकानदारानं बॉलिवूड स्टाईलनं चोराला पळवून लावलं आहे.

First published: March 15, 2020, 10:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या