नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित

नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित

प्रा. शोमा सेन यांना नागपूर विद्यापीठानं निलंबित केलंय. नक्षलवाद्यांना समर्थन आणि पुण्यातील 'एल्गार' परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते.

  • Share this:

नागपूर, ता.15 जून : प्रा. शोमा सेन यांना नागपूर विद्यापीठानं निलंबित केलंय. नक्षलवाद्यांना समर्थन आणि पुण्यातील 'एल्गार' परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. शोमा सेन या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.

याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते.

यासंदर्भात अखेर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळेच भीमा कोरेगाव घटनेनंतर राज्यात दंगल उसळली असा पोलीसांचा आरोप आहे.

हे सर्व जण शहरी भागात राहून नक्षलवाद्यांना समर्थन देत असतात असा त्यांच्यावर आरोप आहे. शहरी भागात नक्षली या मंडळींचा थिंक टँक म्हणून उपयोग करून घेत असते. नक्षल्यांना आर्थिक मदत आणि त्यांच्या विचारांप्रती सहानुभूती मिळवण्यासाठी या थिंक टँकचा उपयोग नक्षली करत असतात.

हेही वाचा...

ऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी!

भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी

पतंजलीचं 'परिधान', योग मॅटपासून जीन्सपर्यंत सबकुछ!

कर्ज फेडण्यासाठी 72 वर्षाच्या लक्ष्मीबाई करतात टाईप रायटरचं काम

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading