मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! मटका अन् दारुबंदीसाठी 'शोले' स्टाइल आंदोलन; तेरा तासांपासून तरुण टॉवरवर

धक्कादायक! मटका अन् दारुबंदीसाठी 'शोले' स्टाइल आंदोलन; तेरा तासांपासून तरुण टॉवरवर

गावात सुरू असलेला अवैध मटका आणि दारूचे व्यवसाय बंद (protest for ban Illegal liquor business) व्हावेत, यासाठी तरुणानं 'शोले' स्टाइल आंदोलन (Sholay style protest ) केलं आहे.

  • Published by:  News18 Desk
लातूर, 12 ऑक्टोबर: लातूर जिल्ह्यातील चिंचोली याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. गावात सुरू असलेला अवैध मटका आणि दारूचे व्यवसाय बंद (protest for ban Illegal liquor business) व्हावेत, यासाठी तरुणानं 'शोले' स्टाइल आंदोलन (Sholay style protest ) केलं आहे. संबंधित तरुण गेल्या तेरा तासापासून गावातील 250 फुट उंच असलेल्या टॉवरवर चढून (man climb on 250 feet tower) बसला आहे. गावातील सरपंच, पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी यांनी सर्वांनी अनेकदा विनवणी केली तरीही हा तरुण खाली उतरायला तयार नाही. दारुबंदीसाठी अचानक तरुण टॉवरवर चढल्याने हे केवळ आंदोलनच आहे, की दुसरं काही याबाबत गावकऱ्यांत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. नवनाथ हरिभाऊ जलदे असं टॉवरवर चढलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथील रहिवासी आहे. नवनाथ जलदे हे सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास टॉवरवर चढले आहे. रविवारी रात्री दीड वाजेपर्यंत हा तरुण टॉवरवरच होता. गावकऱ्यांनी, पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत घालूनही हा तरुण टॉवरवरून खाली उतरायला तयार नाही. काल सायंकाळी अग्निशमन दलाचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यात बापाने अडकवली साडी, त्रिशुळाने करत होता वार आणि तेवढ्यात.... तरुणाच्या अनोख्या आंदोलनाचा चर्चा सध्या गावभर झाली असून घटनास्थळी अनेकांनी गर्दी केली आहे. चिंचोली-बल्लाळनाथ गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. गावात सुरू असलेला दारूचा व्यवसाय, गुटखा, मटका बंद करण्यात यावा, यासाठी तरुणाने अचानक टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे. तरुणाच्या या कृत्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. हेही वाचा- 16 वर्षीय युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी; सुसाइड नोटमधून PM मोदींकडे अखेरची मागणी रात्री बाराच्या सुमारास गावातील सर्व लोकं टॉवरपासून आपापल्या घरी निघून गेले तरीही हा तरुण टॉवरवरून खाली उतरला नाही. टॉवरची उंची जवळपास 250 फूट इतकी आहे. तसेच टॉवरला संरक्षक भिंत नसल्याने याठिकाणी कोणालाही सहज येता येतं. दारुबंदीसाठी तरुणाने केलेल्या अशा प्रकारच्या आंदोलनामुळे गावातील अवैध व्यवसाय चालवणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.
First published:

Tags: Latur

पुढील बातम्या