चार मांजरींनी केली 'कोब्रा' नागाची नाकेबंदी, या बॉलिवूड अभिनेत्याचा VIDEO व्हायरल

चार मांजरींनी केली 'कोब्रा' नागाची नाकेबंदी, या बॉलिवूड अभिनेत्याचा VIDEO व्हायरल

हा खेळ बघत बसण्यापेक्षा सापाला वाट करून द्यायला पाहिजे होतं किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे होतं असं लोकांनी त्यांना सुनावलं.

  • Share this:

मुंबई 18 सप्टेंबर : 'कोब्रा' असं नाव जरी काढलं तरी भल्या भल्यांची पाचावर धारण बसते. सापांमध्ये 'कोब्रा' हा सर्वात विषारी आणि आक्रमक नाग समजला जातो. मात्र मुंबईत चार मांजरांनी एका 'कोब्रा' नागाचा व्हिडीओ अडवून धरला आणि त्याला कोंडीत पकडलं असं सांगितलं तरीही ते खरं वाटणार नाही. मात्र अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) यांनी Instagramवर चार मांजरी आणि एका कोब्रा नागाचा Video शेअर केला. हा Video चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी कौतुक करत नील नितीन मुकेश यांना पर्यावरण आणि प्राणी प्रेमाविषयी चार गोष्टीही सुनावल्या आहेत.

नील नितीन मुकेश हे काही कामासाठी बाहेर जात असताना पार्किंगमध्ये आपल्या गाडीकडे जात होते. त्याच वेळी तिथे साप आणि चार मांरींचा हा खेळ सुरू होता. तो खेळ पाहून नीलही तिथे थांबले त्यावेळी कुणीतरी हा व्हीडीओ शुट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या चार मांजरींनी कोब्रा नागाला घेरलं आणि त्याचा रस्ता अडवून धरला. त्या मांजरींच्या तावडीतून सुटण्यासाठी तो कोब्रा बराच वेळ प्रयत्न करत होता, मात्र त्याला यश येत नव्हतं. त्याची चारही बाजूंनी नाकाबंदी मांजरांनी केली होती.

घबाड सापडणार? मराठवाड्यात 'खासगी क्लासेस'वर Income Taxच्या धाडी

कोब्रा ज्या दिशेला जाईल त्या दिशेनं त्या मांजरी त्याला रोखत होत्या. तो नाग फुत्कारत प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याची डाळ काही शिजत नव्हती. त्याने फणा काढून मांजराच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका मांजराने आपल्या पंजाने त्याला दणका दिला. त्यामुळे कोब्रा बॅकफुटवर गेला. अतिशय चपळ असलेला हा कोब्रा अडकलेले पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं.

नागपूर बनली 'क्राईम सिटी', मुख्यमंत्र्यांना मत मागण्याचा अधिकार नाही- पवार

शेवटी तो कोब्रा दोन मांजरांच्या मधून शेजारच्या कुंड्यांच्यामध्ये पळून जाण्यात यशस्वी ठरला. चार मांजरी एकत्र आल्या तर काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. अनेकांनी यावरून नील यांना सुनावलही. हा खेळ बघत बसण्यापेक्षा सापाला वाट करून द्यायला पाहिजे होतं किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे होतं असं लोकांनी त्यांना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading