धक्कादायक! शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांची दुचाकी ट्रकने उडवली; तिघांचा जागेवरच मृत्यू

धक्कादायक! शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांची दुचाकी ट्रकने उडवली; तिघांचा जागेवरच मृत्यू

सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्याहून साईभक्त शिर्डीला जात आहेत. अशातच एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 3 जानेवारी : सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्याहून साईभक्त शिर्डीला जात आहेत. अशातच एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईहून नाशिकमार्गे शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांच्या दुचाकीला उड्डाणपुलावर अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन साईभक्त ठार झाले आहेत.

सध्या विविध साई मंदिर आणि संस्थांमधून मोठ्या संख्येने साई भक्त पालखी घेऊन शिर्डीच्या दिशेने रवाना होत आहेत. दरम्यान या अपघातामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. नाशिक येथील लेखानगर महामार्गावरील उड्डाण पुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक साईभक्त गंभीर जखमी आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता 10 ते 15 साई भक्त दुचाकीवरुन शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. रविवारी रात्री साधारण साडे बाराच्या सुमारास एका अज्ञात ट्रकने होंडा युनिकॉन एम एच 02 एफडी 4248 व होंडा डिवो एम एच02 दुचाकींना उडवले. या अपघातात वैजनाथ चव्हाण (21), सिद्धार्थ भालेराव (22), आशिष पाटोळे (19) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मुंबईतील विलेपार्ले येथील राहणारे आहेत. यातील अनिष वाकळे (17) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: January 3, 2021, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading