लॉकडाऊनमधील धक्कादायक प्रकार, मुंबईतील मुलीचं केलं अपहरण; राजस्थानमध्ये नेऊन केला बलात्कार

लॉकडाऊनमधील धक्कादायक प्रकार, मुंबईतील मुलीचं केलं अपहरण; राजस्थानमध्ये नेऊन केला बलात्कार

कोरोच्या लॉकडाऊनमध्ये या 13 वर्षीय मुलीला मुंबईहून राजस्थानला नेण्यात आलं

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध आणण्यात आले आहेत. या संकटात एका 13 वर्षीय मुलीच्या कुटुंबावर आणखी एक संकट कोसळलं आहे.  आग्रीपाडा येथे राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर फेसबुक मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी 22 वर्षीय तरुणासह राजस्थान, मध्य प्रदेश या भागातून 4 जणांना ताब्यात घेतलं आहे.

1 जुलैपासून मुलगी घरातून बेपत्ता असल्याने तिच्या आईने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलीस तपासात ही मुलगी फेसबुकच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात असल्याची बाब समोर आली. त्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आरोपी तरुणांचा शोध घेण्यात आला. यासाठी आरोपीला त्याच्या दोन मित्रांनी मदत केली. आरोपी हा पीडित मुलाचा फेसबुक यादीतील असल्याची बाब समोर आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी याचा खुलासा केला.

हे वाचा-पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; सोशल मीडियावरुन दिली माहिती

तपासादरम्यान मुख्य आरोपीने सांगितले की, त्याने या गुन्ह्यासाठी  आपल्या मित्राची मदत घेतली होती. तिचं अपहरण करुन राजस्थानमध्ये आणण्यात आले होते. ज्या वाहनाने मुलीला राजस्थानमध्ये आणण्यात आले ती लॉकडाऊनमध्येही थांबविण्यात आली नसल्याचे आरोपीने सांगितले.

हे वाचा-सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोविडमधून बरा झालेल्या रुग्णाच्या स्वागताला मोठी गर्दी

अपहरण केल्यानंतर त्या 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 7, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या