पंढरपूर, 03 जुलै : तरंगफळ इथे सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसच्या गळतीमुळे अचानक आग लागली. यामध्ये आई आणि दोन मुलं गंभीररित्या भाजली ज्यामुळे दोन्ही मुलांसह आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (वय -30) आणि सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय 7) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय 5) अशी मृत्यू झालेल्या आई आणि मुलांची नावं आहेत.
आई सोनल या सकाळी स्वयंपाक करत होत्या. काही कामाने त्या बाहेर गेल्या होत्या. घरात अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला. यावेळी दोन्ही मुलं घरात झोपली होती. आगीचा भडका दिसताच सोनल झोपलेल्या मुलांना काढण्यासाठी घरामध्ये गेल्या. परंतु आगीचा भडका वाढत गेला. त्यामुळे आईला मुलांना दरवाजातून बाहेर घेऊन येता आलं नाही.
BREAKING : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरू, हे रस्ते केले बंद
गॅसच्या गळतीमुळे आग लागली आणि गॅस सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीमुळे कोणीच आत जाण्यास तयार नव्हतं. अशातच गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून गावकऱ्यांच्या साह्याने पाठीमागील भिंत पाडून दोन लहान मुले व आई यांना बाहेर काढलं. तिघेही जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत होते. त्यांना तातडीने अकलूज इथल्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आलं.
अन् गृहमंत्र्यांनी उदयनराजे भोसले यांना केला मुजरा, या गाण्यासह VIDEO व्हायरल
तोपर्यंत सावळा ज्ञानेश्वर शिंदे या मुलाचा मृत्यू झाला होता. आई सोनल व मुलगा कृष्णा जास्त भाजले असल्याने त्यांना सोलापूर इथं सिव्हिल हॉस्पिटल हलण्यात आलं. यावेळी कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला .आई सोनल यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी मल्लिनाथ लकडे व पल्लवी डांगे घटनास्थळी आले होते या घटनेमुळे तरंगफळ गावात शोककळा पसरली आहे.
कोण आहे विकास दुबे ज्याने केलं DSP सह 8 पोलिसांना ठार?
दोघांनी दाखवलं धाडस
गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत भडका होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो म्हणून गावातील लोक केवळ पाहून भयभीत होऊन बाहेर निघून जात होते. परंतु गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून भिंत पाडून सर्वाना बाहेर काढलं.
संपादन - रेणुका धायबर