मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Shocking! चक्क खारुताईने माजवली दहशत; तब्बल 18 लोकांना केलं रक्तबंबाळ

Shocking! चक्क खारुताईने माजवली दहशत; तब्बल 18 लोकांना केलं रक्तबंबाळ

सगळ्यांची आवडती खारूताई हिंसक होऊ शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का?

सगळ्यांची आवडती खारूताई हिंसक होऊ शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का?

सगळ्यांची आवडती खारूताई हिंसक होऊ शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का?

   मुंबई, 30 डिसेंबर-   छोटीशी, नाजूकशी खारूताई  (Squirrel)   आपल्या बहुतेकांना अगदी आवडणारी असते. क्षणात इकडून तिकडे पळणाऱ्या आणि उंच झाडांवर चढणाऱ्या खारूताई अनेक ठिकाणी दिसतात. श्रीरामानं सेतू बांधताना याच खारूताईंनी केलेल्या मदतीची गोष्टही आपल्याला माहिती आहे. अशी ही सगळ्यांची आवडती खारूताई हिंसक होऊ शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का?

  खरं तर आपली चाहूल जरी लागली तरी खारुताई पळून जातात इतक्या त्या घाबरट असतात. त्यामुळे एखाद्या खारुताईनं कुणाला जखमी केलं असं जर कुणी म्हटलं तर विश्वास ठेवण कठीण आहे. पण ब्रिटनमधील फ्लिंटशायरमध्ये (UK, Flintshire) एका खारूताईनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ही खारुताई (Squirrel) अक्षरश: लोकांच्या जीवावर उठली होती. ही खारुताई ज्येष्ठ माणसं, लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना जखमी करत होती. एकाच आठवड्यात या खारूताईनं चक्क 18 जणांना जखमी केलं आहे. भरपूर चपळ असल्याने या खारुताईला पकडण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. रिसायकलिंग बॅग्ज कचऱ्याच्या डब्यात टाकणाऱ्यांना ही खारुताई चावल्याचं समोर आलं आहे. शेवटी जाळं टाकून या खारुताईला पकडण्यात आलं आणि मग तिला एका प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या स्वाधीन करण्यात आलं.

  परंतु तिला पुन्हा जंगलात सोडणं धोकादायक असल्यानं तिला मारुन टाकल्याचं RSPCA नं स्पष्ट केलं आहे. सामान्यपणे मानवी वस्तीत शिरलेल्या हिंस्र किंवा पिसाळलेल्या प्राण्यावर उपचार केले जातात. कधीकधी त्यांना प्राणी संग्रहालयात ठेवलं जातं किंवा नैसर्गिक अधिवासातही सोडलं जातं. पण या खारुताईबाबत यातलं काही घडलं नाही. ही खारूताई ग्रे स्क्विरल (Gray Squirrel) होती. त्यामुळे नियमांनुसार तिला मोकळं सोडता येत नव्हतं. ग्रे स्क्विलरपेक्षा लाल स्क्विरल पूर्णपणे वेगळी असते. पण या खारुताईला मारणंच योग्य होतं असं संस्थेचं म्हणणं आहे.

  अगदी पकडायला गेलेल्या एका व्यक्तीलाही ही खारुताई चावली होती. अनेकांच्या हातावर या खारुताईनं ओरबाडल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे या खारुताईचं नाव ‘ स्ट्राईप ’(Stripe)   असं ठेवण्यात आलं. संधी मिळताच ही खारूताई अक्षरश: लोकांवर तुटून पडायची आणि त्यांना जखमी करायची. ब्रिटनमधील वन्य जीवांसंबंधीच्या कायद्याला अनुसरून तिथल्या संस्थेनं या खारुताईला मारलं असेल. पण स्ट्राईप अशी का वागत होती याचा शोध कुणीतरी घ्यायला हवा हे मात्र नक्की. ही बातमी वाचल्यानंतर आता तुम्हीही एखाद्या छानशा गोंडस खारुताईला पाहिलंत तर तिला गोंजारण्यापूर्वी एकदा विचार कराल.

  First published:

  Tags: Photo viral