आई-लेकराच्या नात्याची 'हत्या', मुलाने केला जन्मदात्या माऊलीवर बलात्कार

आई-लेकराच्या नात्याची 'हत्या', मुलाने केला जन्मदात्या माऊलीवर बलात्कार

धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता.

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 11 डिसेंबर : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं आपण नेहमी ऐकतो आणि उदाहरणही देतो. एक आई आपल्या लेकरासाठी सर्वकाही असते. पण, नऊ महिने पोटात ठेवून लहानाचा मोठा केलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबादेत घडली आहे.

औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात ही घटना घडली. आईच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा नराधम मुलगा अत्याचार करत होता. शुभम भालेराव (वय 20) असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शहरातील सिडको परिसरात आपल्या दोन मुलांसह राहते. पीडित महिलेच्या पतीचं सात वर्षांपूर्वी निधन झालं. या महिलेल्या दोन मुलीही आहे. आरोपी शुभम भालेराव (वय 20) हा पीडित महिलेचा मोठा मुलगा असून त्याला दारू पिण्याचं व्यसन जडलं होतं. तसंच तो काहीही काम करत नव्हता. शुभम हा दारू पिण्यासाठी नेहमी पीडित महिला आणि त्यांच्या मुली जेव्हा घरी येतात. तेव्हा मारहाण करून दारूसाठी पैसे मागायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. दारूच्या आहारी गेलेल्या या नराधम मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यापासून अत्याचार केले.

तसंच आपण केलेल्या या काळ्या कृत्याची कुठे वाच्यात होऊ नये म्हणून तो पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. आपल्या मुलाच्या या काळ्या कृत्यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता.

दिनांक 10 डिसेंबर रोजी आरोपी शुभम हा संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. पीडित महिला ही घरी एकटीच असताना आरोपीने बळजबरीने तिच्या अत्याचार केला. त्यानंतरही पीडितेला मारहाण करून "गुपचूप बस आरडा ओरडा करू नकोस नाहीतर तुला मारून टाकेल", अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर आपल्याच मुलाकडून होत असलेल्या अत्याचारामुळे हादरालेल्या या महिलेनं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडिते महिलेची हकीकत ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. या पीडित महिलेनं आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंतही पोलिसांना केली.

पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 11, 2019, 11:43 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading