ज्या वॉकरने चालायला शिकणार त्यानेच संपलं आयुष्य, चिमुकल्याच्या मृत्यूने काळजाचं पाणी

ज्या वॉकरने चालायला शिकणार त्यानेच संपलं आयुष्य, चिमुकल्याच्या मृत्यूने काळजाचं पाणी

रंजीत सारंग ठाकरे असं मृत बाळाचं नाव आहे. 13 जानेवारीला वॉकरवर खेळत असताना रंजीत खाली पडला. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

  • Share this:

प्रशांत मोहिते, प्रतिनिधी

नागपूर, 20 जानेवारी : नागपूरमध्ये 17 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वॉकरमधून पडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली आहे. घरात लहान बाळ म्हटलं की आनंदाचं वातावरण असतं पण त्याच गोड बाळाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत सारंग ठाकरे असं मृत बाळाचं नाव आहे. 13 जानेवारीला वॉकरवर खेळत असताना रंजीत खाली पडला. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटना घडताच त्याने मोठ्याने रडायला सुरुवात केली. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला ट्रामा सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

इतर बातम्या - मनसेच्या महाअधिवेशानाआधी मोठा धमाका होणार? नेत्याने घातली शिवसैनिकांना साद

रंजीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या उपचारांचा काहीही परिणाम झाली नाही यातच त्याच्या मृत्यू झाला आहे. रंजीतच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या 17 महिन्यांपासून बाळाच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण त्यानंतर असं काही झालं की संपूर्ण घरात शांतता पसरली आहे.

इतर बातम्या - 70 मोबाईल, 7 लॅपटॉप आणि 11 जण! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर लावला 2 कोटींचा सट्टा

बाळाच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांची सगळी स्वप्न पाण्यात गेली आहेत. बाळाच्या सुखासाठी सगळे जगत असताना त्यांच्या आनंदाची वात विझली आहे. या संपूर्ण प्रकाराची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

इतर बातम्या - शिवसेनेतील दोन गटांत तुफान राडा, पदाधिकाऱ्याचे डोके फुटले

First published: January 20, 2020, 11:34 AM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या