S M L

नको ते धाडस!, पूल पार करताना 'तो' गेला वाहून

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2018 11:55 PM IST

नको ते धाडस!, पूल पार करताना 'तो' गेला वाहून

लातूर, 09 जून :  पुराच्या पाण्यातून पुल पार करण्याचं नसतं धाडस एका तरूणाच्या अंगलट आलंय. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडीत पुराच्या पाण्यातून पुल पार करताना एक तरूण वाहू गेल्यानं त्याचा मृत्यू झालाय.

लातूर जिल्ह्याला आज पावसानं चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे घरणी नदीला महापूर आल्यानं नागेवाडीतील पुलावरुन पुराचं पाणी वाहत होतं. याच पाण्यातून पुल पार करण्याचं नको ते धाडस या तरूणानं केलं. काठावर उभ्या लोकांनी त्याला पाण्यात न उतरण्याचा सल्ला देखील दिला. मात्र तरूणानं तो ऐकला नाही.

पुल ओलांडताना पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहात वाहुन गेला. पाणी जास्त असल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. प्रकाश गुंडप्पा जळकोटे असं या मृत तरूणाचं नाव आहे. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं मोबाईल कॅमे-यात कैद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 11:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close