गुजरातमधील किळसवाणा प्रकार; डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं लज्जास्पद कृत्य

गुजरातमधील किळसवाणा प्रकार; डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केलं लज्जास्पद कृत्य

लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजवरुन हा किळसवाणा प्रकार समोर आला

  • Share this:

अहमदाबाद, 12 जानेवारी : जगात असे अनेक लोक आहेत जी विचित्र प्रकार करीत असतात. अनेकदा लोक सर्व सीमा पार करतात. एका डिलिव्हरी बॉयनेही असचं काहीसं कृत्य केलं आहे. जे ऐकल्यानंतर तुमचं रागावर नियंत्रण राहणार नाही. कारण त्याने कोणतंही विनोदी कृत्य केलेलं नाही, तर अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. नेमकं काय केलं या डिलिव्हरी बॉयने?

ही घटना गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. (delivery boy did a shameful act in the elevator ) सांगितलं जात आहे की, डिलिव्हरी बॉय येथे कोणाच्या घरी सामान देण्यासाठी आला होता. तो लिफ्टने वर जात होता. त्यावेळी त्याच्याशिवाय लिफ्टमध्ये कोणी नव्हते. मात्र यामध्ये त्याने सर्व मर्यादा पार केल्या आणि लिफ्टमध्येच लघवी केली. इतकच नाही तर त्याने सर्वत्र घाण पसरवली. धक्कादायक म्हणजे जेव्हा त्याने हे कृत्य केलं तो वारंवार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहत होता. याशिवाय तो हेल्मेटने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करीत होता.

हे ही वाचा-गेल्या आठ दिवसांत देशात हृदय पिळवटून टाकणाऱ्या बलात्काराच्या पाच घटना

यापूर्वीही झालीये अशाप्रकारची घटना

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (delivery boy did a shameful act in the elevator) या घटनेबाबत कळताच सोसायटीत गोंधळ उडाला आहे. अद्याप या आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. मात्र ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. ही पहिली घटना नसून यापूर्वीही 2018 मध्ये चीनमधून अशा प्रकारची घटना समोर आली होती. ज्यामध्ये एक व्यक्ती लिफ्टमध्ये लघवी करीत असल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

Published by: Meenal Gangurde
First published: January 11, 2021, 11:06 PM IST
Tags: Gujrat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading