मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बीडमधील धक्कादायक घटना, तब्बल 12 तासांनंतर मिळाली कोरोनाबाधितांना रुग्णवाहिका!

बीडमधील धक्कादायक घटना, तब्बल 12 तासांनंतर मिळाली कोरोनाबाधितांना रुग्णवाहिका!


बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत.

बीड, 05 सप्टेंबर : 12 तासांपासून ताटकळत बसलेल्या कोरोना  पॉझिटिव्ह रुग्णांना न्यूज 18  लोकमतच्या बातमी नंतर अवघ्या अर्ध्या तासात रुग्णवाहिका मिळाली. धक्कादायक म्हणजे, रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेले 5 रुग्ण हेत गावात मुक्त संचार करत होते.

कोरोना रुग्णासंदर्भात बीड जिल्ह्यामधील लिंबागणेशमध्ये आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघडकीस आला होता.  रात्री अकरा वाजता कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्यानंतर तेव्हापासून फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने पाच रुग्णांना तब्बल 12 तास ताटकळत बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला  होता. याबद्दलची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्या नंतर तातडीने सूत्र हलली आणि अवघ्या अर्ध्या तासात  रुग्णाला सुविधा मिळाली. 12 तास ताटकळत उभा असलेल्या रुग्णांनी मात्र आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला.

पुण्यातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग, घटनास्थळाला पहिला VIDEO

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत. त्यामुळे रुग्णांना एकत्रित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाते. रुग्णवाहिका कमी असल्यामुळे जिल्ह्यातील  रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास उशीर होत असल्याचे आरोग्य यंत्रनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दार उघडून बाहेर येईपर्यंत पुरात वाहून गेली कार, पाहा थरारक VIDEO

मात्र, या गंभीर प्रकरणाकडे कुठलाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही म्हणून देखील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: बीड