मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Shocking! रागाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला; आधी विष देऊन केलं बेशुद्ध

Shocking! रागाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला; आधी विष देऊन केलं बेशुद्ध

पत्नी त्या दिवशी खूप वैतागली होती, शेवटी रागाच्या भरात तिने धक्कादायक कृत्य केलं.

पत्नी त्या दिवशी खूप वैतागली होती, शेवटी रागाच्या भरात तिने धक्कादायक कृत्य केलं.

या कृत्यानंतर महिला मुलांना घेऊन फरार झाली.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 8 ऑगस्ट : तसं पाहता सर्वच घरात पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. काही वेळ वाद झाल्यानंतर पुन्हा दाम्पत्य एकत्र दिसून येतं. ही प्रत्येक घराची कहाणी आहे. मात्र बिहारमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारची राजधानी पाटनामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये वाद झाला. या वादानंतर पत्नीने अत्यंत भयावह पाऊल उचललं. जे वाचून कोणीही सुन्न होईल. ही घटना फुसवारी भागातील आहे. या भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. यामुळे नाराज पत्नीने आपल्या पतीच्या जेवणात विष दिलं आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. यानंतर पीडित पतीने स्वत:ला पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.

घटनेनंतर फरार झाली पत्नी

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी पत्नी आपल्या दोन मुलांसह फरार झाली. दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेत पती पोलीस ठाण्यात पोहोचला. येथे आल्यानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इतकच नाही तर त्याला कानाखालीदेखील मारलं. यानंतर त्याने ओळखीतील एका पोलिसाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-शोभायात्रा झाली शवयात्रा! तरुणाने हाताने उचलली High Voltage तार; एकाचा मृत्यू

जखमी व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं यापूर्वीही लग्न झालं आहे. तिला पहिल्या पतीपासून 5 मुलं होतं. ज्यापैकी तिघांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. पाच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. ज्यानंतर त्यांना दोन मुलं झाली. पतीने आरोप केला आहे की, 7 ऑगस्ट रोजी घरात दोघांमध्ये भांडणं झाली. ज्यानंतर पत्नीने त्याला विष दिलं आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याचं गुप्तांग कापलं. या प्रकरणात पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

First published:

Tags: Crime news, PRIVATE part, Wife and husband