मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /धक्कादायक प्रकार, अवघ्या 30 हजारांसाठी 21 महिला झाल्या विधवा

धक्कादायक प्रकार, अवघ्या 30 हजारांसाठी 21 महिला झाल्या विधवा

हा प्रकार मन सुन्न करणारा आहे...

हा प्रकार मन सुन्न करणारा आहे...

हा प्रकार मन सुन्न करणारा आहे...

लखनऊ, 21 जुलै : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणाच वाढला की, अवघ्या 30 हजारांसाठी तब्बल 21 महिलांना विधवा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Officials and brokers corruption in the scheme and seized Rs 30,000 given to poor widowed women.)

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुखाचा 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 30 हजार रुपयांचा मदत निधी दिला जातो. या योजनेत अधिकारी आणि दलालांनी भ्रष्टाचार केला आणि गरीब विधना महिलांना दिल्या जाणाऱ्या 30 हजार रुपये बळकावले.

चित्रकूट, बलरामपूर, गोरखपूर, कानपूर या योजनेत घोटाळ्याबाबत यापूर्वी तक्रार दाखल केली आहे. नुकतच प्रकरण लखनऊ येथून समोर आलं आहे. येथे 21 खोट्या लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे. ज्या महिलांचे पती जिवंत असतानाही त्यांना मृत असल्याचं घोषित केलं. आणि त्यातून मिळालेला लाभ अधिकाऱ्यांच्या खिशात गेला.

हे ही वाचा-अमानुषतेचा कळस! विजेचा धक्का देऊन केला वडिलांचा खून; रात्री ट्रॉलीत नेऊन...

महिलांना मिळाले 15 हजार तर बाकीचे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊनच्या सरोजनी नगर भागातील बंथरा आणि चंद्रावल गावात 2019-20 आणि 2020-21 या दरम्यान एकूण 88 कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाल्याचं दाखविण्यात आलं आहे. सुरुवातीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी 21 महिलांचे पती जिवंत आहेत. या खोट्या मदत निधीतअंतर्गत भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच कमिशन ठरवलेलं असतं. लाभार्थी महिलांना 30 पैकी 15 ते 20 हजार रुपये दिले गेले. यानंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांच निलंबन केलं आहे.सध्या या प्रकरणात तपास सुरू असल्याचं समोर आलं आहे. तपासात दोषी आढळलेल्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Uttar pradesh