धक्कादायक! बाभळीच्या झुडपात सापडलं 2 दिवसाचं अर्भक, काट्याला अडकवली होती बाळाची नाळ

धक्कादायक! बाभळीच्या झुडपात सापडलं 2 दिवसाचं अर्भक, काट्याला अडकवली होती बाळाची नाळ

बाळावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

  • Share this:

बीड, 29 एप्रिल : 2 दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत बाळ काटेरी बाभळीत सोमवारी सकाळी आढळून आलं. बीड तालुक्यातील कपीलधारवाडी इथं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सगळ्यात वाईट म्हणजे बाळाला काटेरी बाभळीच्या झाडाच्या आळ्यात टाकून दिलं होतं. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही बाब प्रातविधीस बाहेर जाणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आली. ज्यावेळी बाळाला पाहिले त्यावेळी काटेरी बाभळीला ते लटकत होते. बाळाची नाळ ही काटयाला अडकवलेली होती. नागरिकांनी तात्काळ बाळाला खाली उतरवले आणि बीडच्या रुग्णालयात दाखल केले.

सध्या या बाळावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र, पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये माणुसकी शिल्लक आहे. का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

हेही वाचा : गतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन केलं मतदान, पार पाडलं राष्ट्रीय कर्तव्य

या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून अत्यंत संताप व्यक्त होत आहे. या घटना रोखण्यासाठी सामाजिक जागृती करणं महत्वाचं आहे. असं सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी म्हटलं आहे.

गावातील लोकांनी बाळाला बाहेर काढल्यानंतर खऱ्या माणुसकीचं दर्शन झालं. यावेळी गावातील महिलांनी तात्काळ धाव घेतली. महिलांनी ओल्या कपड्याने त्याचं अंग पुसलं. तर एका महिलेनं त्याला दुध पाजलं. त्यामुळे बाळाने डोळे उघडले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकरणासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस आता याचा अधिक तपास करत आहेत. बीड ग्रामीण पोलिस या बाबतीत अधिक तपास करत आहेत. तर भा. द.वी 317 अन्वये ग्रामीण पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी दिली.

VIDEO: अश्लील मेसेज पाठवण्याऱ्या रोमियोला तरुणीने बोरीवली स्टेशनबाहेरच धुतलं

First published: April 29, 2019, 2:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading