नवी दिल्ली, 10 मे : क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग. या स्पर्धेला 2008मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूही आयपीएलचा भाग होते. जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता. अख्तरनं कोलकाताकडून 3 सामने खेळले आणि 5 विकेट घेतल्या होत्या. शोएब अख्तर आयपीएलमध्ये तीनच सामने खेळू शकला, मात्र त्याला भारतातील सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्याचा अनुभव मिळाला.
या दरम्यान, शोएब अख्तर क्रिकेट व्यतिरिक्त तो बॉलीवूडमध्येही चर्चेत होता. शोएब अख्तरचा या दरम्यानच पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजासोबतची एक मुलाखत चांगलीच गाजली होती. त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. शोएब अख्तरने या व्हिडीओमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्याविषयी काही वादग्रस्त खुलासा केला होता.
वाचा-'यूपीच्या खेळाडूंना टीम इंडियात संधी नव्हत्या पण...', भारतीय माजी खेळाडूचे विधानशाहरूख खानचा फॅन झाला होता अख्तर
शोएब अख्तर हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. शाहरुखचे कौतुक करताना अख्तरनं म्हटलं होतं की, शाहरुख खूप चांगला माणूस आहे. तो मला सांगायचा की मी तुझ्या मोठा भावासारखा आहे, मी जे सांगतो ते तू कर. अख्तर पुढे म्हणाला, 'शाहरुखने उडी मारून माझी पप्पी घ्यायचा. शाहरुखला गालांवर किस करणाची आवड आहे. ज्या व्यक्तीला तो एकदा भेटतो, त्याला आपलसं करतो'.
वाचा-शाहरुख खानसोबत Video Call वर बोलण्याची संधी, पण करावं लागेल हे कामसलमानसोबत बाईक राइडिंग
शोएब अख्तर म्हणाला की, सलमान खानशी त्याची खूप चांगली मैत्री आहे आणि बॉलिवूडमधील दबदबा निर्माण करणारा तो एकमेव माणूस आहे. शोएब म्हणाला, "सलमान माझ्या भावासारखा आहे. एकदा सलमान, मी वांद्रेमध्ये कतरिना कैफ आणि साजिद नाडियाडवाला एकत्र होते. कतरिनानं आमच्यासाठी जेवण केलं. मी बाईक चालवायची इच्छा व्यक्त केल्यावर सलमाननं तेही पूर्ण केलंं". त्यानंतर सलमान आणि शोएब बाईकवरून शाहरुखच्या घरी पोहचले. शोएब असेही म्हणाला की, "सलमान हा हृदयाचा राजा आहे. तुम्ही म्हणाल मला हे हवे आहे. ते तो देईल. त्याला माझ्यासारखा थोडा रागही येतो".
वाचा-ना कपूर ना खान, लॉकडाऊनमध्ये Google वर सर्वाधिक सर्च झाल्या या हॉट अभिनेत्रीकतरिनाला दीदी म्हणतो शोएब
या मुलाखती दरम्यान कतरिनाबाबत शोएबनं वादग्रस्त विधान केले होते. अख्तर म्हणाला की, "कॅतरिना कैफ एक दिवस माझ्याकडे आली होती. तिने मला मिठी मारली". यावेळी कतरिनाने, अख्तर आणि सलमान यांना वादग्रस्त गोष्टींपासून लांब ठेवणं कठिण असल्याचंही यावेळी सांगितल्याचे अख्तर म्हणाला. शोएब अख्तरने सांगितलं की तो कॅटरिना कैफला दीदी म्हणतो. असं असलं तरी असं दिसतं की अख्तरनं फक्त विनोदात रमीज राजाला हे सांगितलं.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.