कंगनाच्या कुठल्याही टीकेला शिवसेना देणार नाही उत्तर, नेत्यांना आणि प्रवक्त्यांना महत्त्वाचा आदेश

कंगनाच्या कुठल्याही टीकेला शिवसेना देणार नाही उत्तर, नेत्यांना आणि प्रवक्त्यांना महत्त्वाचा आदेश

शिवसेना विरुद्ध कंगना हे Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या Tweet ने त्यात भर पडली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात सध्या एकीकड कोरोना तर दुसरीकडे कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. कंगना रणौत मुंबईत आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना वादाला शाब्दिक युद्धाचं स्वरूप आलं होतं. शिवसेना विरुद्ध कंगना हे Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या Tweet ने त्यात भर पडली आहे. पण या सगळ्यात शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अजूनही या विषयावर न बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं होतं त्यावर आता तर तिने थेट बाळासाहेब ठाकरेंवरून ट्वीट केलं आहे. सत्तेसाठी शिवसेना ही 'सोनिया सेना' झाली आहे. शिवसेनेनं सत्तेसाठी बाळासाहेबांचा विचार सोडला अशा शब्दात कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर माझं घर महापालिकेनं नाही तर गुंडांनी तोडलं असंही कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पण यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

या कारणामुळे पुण्यात वाढला कोरोनाचा धोका, मुंबईलाही टाकलं मागे

शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अजूनही या विषयावर न बोलण्याचे आदेश आहे. कालही शिवसेनेने या विषयावर कोणीही न बोलण्याचा आदेश दिला होता. अजूनही शिवसेनेचं या विषयावर मौनच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर कधी बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 'मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही', असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली होती.

महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांना जाणारा ऑक्सिजन थांबवला, MPमध्ये भयावह परिस्थिती

'करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते!', असं नवं Tweet करत कंगनाने उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं.

'सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी...' इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

अशी झाली युद्धाला सुरुवात

संतप्त कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि सोशल मीडियावर युद्धाला तोंड फुटलं. कंगनाचे समर्थक तिची बाजू घेत असले, तरी मुंबईकर ड्रामा क्वीनवर नाराज झाले. मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा मुंबईला पाकिस्तान असल्याचं म्हटलं. "मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे", असं ट्वीट तिनं केलं होतं.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 10:55 AM IST

ताज्या बातम्या