या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

दोन्ही मतदार संघ शिवसेनेला न सोडल्यास भाजपा विरोधात दोन्ही मतदार संघातून उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

  • Share this:

कल्याण, 29 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेत युती होणारी की नाही याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अखेर दोन्ही पक्षांकडून युती होणार असल्याचे संकेत आता मिळताहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचा लवकरच 'घट' बसणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. असं असताना कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व विधान सभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे. मात्र, दोन्ही मतदार संघ शिवसेनेला न सोडल्यास भाजपा विरोधात दोन्ही मतदार संघातून उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी मूलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर, राजेंद्र देवळेकर, रवी पाटील, श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील यांच्यासह कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश जाधव आणि महेश गायकवाड या उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराला विरोध करत कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी दोन हात करण्यासठी सज्ज झाले आहेत.

कल्याण शिवसेनेतील दोन्ही मतदार संघातील उमेदवारांपैकी एका उमेदवाराला सर्वानुमते अपक्ष उमेदवार मागणू उभा करून भाजपाची सीट पाडण्याचा निर्धार करत शिवसेना शहर शाखेबाहेर सर्वच उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी घोषणाबाजी केली. त्यामुळे कल्याणच्या या मतदारसंघामुळे युतीत फूट पडण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - मुख्यमंत्री देणार काँग्रेसला धक्का, सोमवारी भाजपमध्ये पुन्हा मोठी इनकमिंग

दरम्यान, मुखमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून युती होणार असल्याचे संकेत मिळालेत. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी युती होणार असून जागावाटपावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रविवारी दिल्लीत भाजपच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

भाजपच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक सुरू

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होतेय.. या बैठकीला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरुवात झालीये.. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत.. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.

इतर बातम्या - विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, मुंबईत या उमेदवारांना मिळालं तिकीट!

युतीची अधिकृत घोषणेपूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना वाटले AB फॉर्म..

शिवसेना आणि भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास केली सुरवात.शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना AB फार्म वाटण्यास सुरवात केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईत उपस्थित आहेत त्यांना देखील AB फॉर्म देण्यात आलेत. सध्या युतीत ज्या मतदारसंघाचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना AB फॉर्म देत असल्याची माहीती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या