शिवसेनेनं उमेदवारी नाकारली, खासदाराच्या समर्थकाचा भर सभेत आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज समर्थकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 09:33 PM IST

शिवसेनेनं उमेदवारी नाकारली, खासदाराच्या समर्थकाचा भर सभेत आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद, 23 मार्च : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट वाटपानंतर आता नाराजी उफाळून येऊ लागली आहे. उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज समर्थकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

उमरगा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये रवींद्र गायकवाड यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात आली होती. पक्षानं तिकीट दिलेल्या ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पण तरीदेखील रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे नाराज समर्थकाने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे शिवसैनिकांच्या बर सभेमध्ये या समर्थकाने अंगावर रॉकेल ओतत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारी मिळावी यासाठी उस्मानबादमधील त्यांचे समर्थक तीव्र होते. त्यासाठी वारंवार त्यांच्या नावासाठी जोर धरण्यात आला. त्यातही जर ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नसल्याचं समर्थकांकडून सांगण्यात आलं होतं.

याच गोष्टीवर नाराजी व्यक्त कर रवींद्र गायकवाड यांचे समर्थक हे मेळ्यामध्ये येताना रॉकेलच्या बॉटल्स घेऊन आले होते. ज्यावेळी ओमराजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा काही समर्थकांकडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात एक समर्थक तर थेट व्यासपीठावरही गेला.


Loading...

VIDEO : कांचन कुल यांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...