शिवसेनेचं ठरेना! या मतदारसंघात उमेदवारांबाबत निर्णय नाहीच

शिवसेनेचं ठरेना! या मतदारसंघात उमेदवारांबाबत निर्णय नाहीच

गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचं जागावाटप निश्चित झाल्याने शिवसेनेने निश्चित केलेल्या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप केलं. मातोश्रीवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या उमेदवारांना AB फॉर्म दिलेत. तर काही फॉर्म्स हे स्थानिक नेत्यांकडे दिलेत. असं असतानाही काही महत्त्वाच्या उमेदवारांवर शिवसेनेकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते.

गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. कारण युतीची घोषणा फक्त पत्रक काढून करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवातही केली होती, पण घोषणा व्हायची बाकी होती. ती सोमवारी संध्याकाळी निव्वळ पत्रक काढून करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळलं. त्यामुळे कोणाला कुठली जागा मिळणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे स्पष्ट झालेलं नाही.

अशात निश्चित झालेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. तर काही उमेदवारांवर अद्याप शिवसेनेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यात या जागा भाजपच्या गोटात गेल्या की काय अशी चर्चा आहे. त्यात असे एबी फॉर्म्स दिल्याने बंडखोरीची शक्यता असल्याने AB फॉर्म देणं थांबविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. युतीच्या घोषणेला वेळ होत असल्याने वेळेवर घाई होऊ नये म्हणून AB फॉर्म्सचं वाटप सुरू करण्यात आलं होतं.

इतर बातम्या - उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे विजय संकल्प रॅली काढून दाखल करणार उमेदवारी अर्ज

काही निवडणुकींमध्ये उमेदवाराला वेळेत AB फॉर्म न मिळाल्याने त्याला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता अशा घटना घडल्या होत्या. आता 2 आणि 3 ऑक्टोंबरला AB फॉर्म उमेदवारांना दिले जातील. जेणे करून बंडखोरांना बंडखोरी करण्यासाठी वेळ मिळू नये यासाठी शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे.

शिवसेनेतील या उमेदवारांवर अद्याप निर्णय नाही :-

वडाळा - श्रद्धा जाधव (इच्छुक)

वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत

भांडूप पश्चिम - अशोक पाटील

बेलापूर - विजय नाहटा (इच्छुक)

हतगांव - नागेश पाटील

सोलापूर मध्य - दिलीप माने

करमाळा - रश्मी बागल

इतर बातम्या - …तर खासदारकीचा राजीनामा देईल, सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

करमाळा मतदारसंघातील बंडाळी थोपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधून आलेल्या रश्मी बागलासंदर्भात सेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्या आज सकाळपासून मातोश्रीवर होत्या. मात्र, त्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागलं. उध्दव ठाकरेंनी 2 ऑक्टोंबरला परत येण्यास सांगितल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. विद्यमान शिवसेना आमदार नारायण आबा पाटीलांनी मातोश्रीवर रश्मी बागल यांना विरोध केला होता.

शिवसेनेचे सुभाष देसाई आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या सहीने हे महायुतीची घोषणा करणारं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. भाजप, सेना. रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयतक्रांती यांची ही महायुती असेल, असं या पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. युतीचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोण किती जागा लढवणार हे लवकरच जाहीर करण्यात होईल, असाही उल्लेख या निवेदनात आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 1, 2019, 7:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading