उद्धव ठाकरेंच्या 'या' सूचक वक्तव्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच?

उद्धव ठाकरेंच्या 'या' सूचक वक्तव्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच?

उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर भाजप-शिवसेनेमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर सध्या चढाओढ सुरू आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. पुढचं सरकार आपलंच असणार आणि पुढेच...! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल असं सूचक वक्यव्य उद्धभ ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या पहिल्या बसचा लोकापर्ण सोहळा पार पडला. तर एसटी कामगारांसाठी निवासस्थानांच्या जमिनीचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्त करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेदेखील उपस्थित होते. पण उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीच्या चर्चेवरून काही बिनसलं का अशा चर्चांणाही उधाण आलं आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक

युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या 2 दिवसांत जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर अद्याप संभ्रम आहे.

गिरीश महाजन युतीवर बोलताना पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची बुधवारी चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक झाली. येत्या 2 दिवसांत युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

विधानसभेसाठी शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम

विधानसभेसाठी शिवसेना 50-50 फॉर्म्युलावर ठाम असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, सेना प्रवक्ते संजय राऊतांनी मात्र 110 -160 चा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. शिवसेना आजही 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेवेळीच विधानसभेच्या जागावाटपांचं सूत्र निश्चित झाल्याचं राऊत म्हणाले आहेत.

इतर बातम्या - VIDEO : मुंबईच्या पावसाबद्दल हवामान विभागाच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

विधानसभेसाठी रिपाईची 10 जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपा-शिवसेनेनं 18 जागांपैकी रिपाइंला 10 जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक रिपाई भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल असंही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा आठवलेंची ही मागणी पूर्ण होते की नाही हे पाहवं लागणार आहे.

SPECIAL REPORT : युतीत जागावाटपात भाजप ठरतोय मोठा भाऊ, सेनेला मान्य?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 07:33 AM IST

ताज्या बातम्या