घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा -उद्धव ठाकरे

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा -उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या जनतेला घरपोच दारू नकोय तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावलंय.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई, ता,15 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या जनतेला घरपोच दारू नकोय तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावलंय. ऑनलाईन दारू हे आपल्या संस्कृतीत नाही. पण राज्याची 'शोभा' करणारा प्रयोग रोजच सुरू असून. दुष्काळग्रस्तं भागात तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. दुष्काळ ग्रस्तांना मदतीच्या रांगेत उभं करून मारू नका. त्यांना घरपोच मदत करा. अशी मागणीही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढून केलीय.

ऑनलाईन दारू विक्रीसाठी राज्य सरकार अनुकूल आहे असं वक्तव्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर सरकारवर चौफेर टीका सुरू झाली. सोशल मीडियावरूनही सरकारवर टीकेची झो़ड उठली होती. दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे अपघात होतात. ते कमी करण्यासाठी ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी देण्यास सरकारची तयारी आहे अशी सरकारची भूमिका असल्याचं म्हटलं जात होतं. यातून सरकारला महसूलही मिळण्याची शक्यता होती. मात्र जनतेच्या विरोधामुळं सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली.

या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत असा कुठलाही निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही आणि सरकार असा निर्णय घेणारही नाही असं स्पष्ट केलं. या निर्णयाला अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणिम मान्यवरांनी विरोध केला होता. आता खुद्द शिवसेना पक्ष प्रमुखांनीच सरकारला सुनावल्याने राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आलीय. राज्य सरकार आधीच दारूला प्रोत्साहन देत असते आणि दारूबंदीचं नाटकही करतं. असे काही निर्णय घेतले तर त्यात आणखीच भर पडेल अशी तीव्र नाराजीही स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली होती.

तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

First published: October 15, 2018, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading