शिवसेनेनं श्रीनगरच्या लालचौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच...!

शिवसेनेनं श्रीनगरच्या लालचौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच...!

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं आज दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात काही वेळातच स्थानिक पोलिसांनी तिरंगा फडकवणाऱ्या 9 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिलं.

  • Share this:

06 डिसेंबर, श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं आज दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात अखेर तिरंगा फडकावून दाखवलाच. अर्थात काही वेळातच स्थानिक पोलिसांनी तिरंगा फडकवणाऱ्या 9 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर थोड्यावेळाने सोडूनही दिलं.

27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं. तुम्ही साधं लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिर मिळवण्याच्या गप्पा मारता, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. फारुक अब्दुलांचं हेच शिवसेनेनं तात्काळ स्वीकारत श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकावून घोषणाबाजीही केली. हे सर्व शिवसैनिक जम्मूचे रहिवासी आहेत.

शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिम्पी कोहली आणि सरचिटणीस मनीष साहनी यांनी यापूर्वी शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याची माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading