हिंगोली, 24 जानेवारी : शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच आहे. संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण केली आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर आमदार संतोष बांगर यांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे.
हे प्राचार्य महिला प्राध्यापकांना त्रास देत असल्याची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे आली होती, त्यानंतर तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाऊन आमदारांनी ही मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, आता शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण, Video Viral#SantoshBangar pic.twitter.com/bscfSuXpcD
— News18Lokmat (@News18lokmat) January 24, 2023
संतोष बांगर हे मागच्या काही काळापासून वादात सापडले आहेत. याआधी त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला निकृष्ट दर्जाचं जेवण देतो, असा आरोप करत मारहाण केली. हिंगोलीमध्येच विमा कंपनी कार्यालयात तोडफोड झाली तेव्हा बांगर यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही संतोष बांगर यांच्यावर करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.