'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपला धडकी

'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपला धडकी

काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर :  'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे' असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्याच नियमांनुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. तर तसं नाही झालं तर आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

पवारांच्या भेटीवर राऊतांचा खुलासा

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी निवडणुकांमध्ये त्यांची ताकद दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, महायुतीची चर्चा आधीच झाली आहे. त्यामुळे सत्तेत समान वाटप झालं पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे. पण तसं झालं नाही तर शिवसेनेनं  मनात आणलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्थिर सरकार आणण्यासाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल. तर ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सरकार स्थापन करण्याची डेरिंग करू नये असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. भाजप देईल ती ऑफर स्वीकराण्यासाठी आम्ही दुकान टाकून बसलो नाही. आम्ही काही व्यापरी नाही आहोत असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिष्टमंडळाची बैठक?

काँग्रेसचं शिष्टमंडळ हे दिल्लीत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह शिष्टमंडळ हे आज सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिणीकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे आता भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेचं जोरदार प्लानिंग सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेकडून सत्तास्थापनेविषयी प्रस्ताव आल्यास गांभीर्याने विचार केला जाईल असं याआधीच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि इतर खात्यांची समान विभागणी असा तोडगा निघाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तास्थापण करू शकते. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading