मुंबई, 03 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज विधान भवनात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सामनाचं सपादकपद, अयोध्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर महत्त्वाची घोषणा केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादकपद हे उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यावर सामनाची भाषा बदलणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. संपादकीय विभागाची जबावदारी संजय राऊतांकडेच राहणार. माझे विचार यापुढेही सामनातून समोर येतील. सामनाची भाषा आणि दिशा बदलली नाही. तर संपादकपद ही आमची अंतर्गत मांडणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ती बदलणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्यापासून राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्यावर उद्धव ठाकरेंनी सगळ्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
हे वाचा - आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच
7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
येत्या 7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक अयोध्येत दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत. देव दर्शनामध्ये राजकारण नको असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना शक्य आहे त्यांनी अयोध्येत दर्शनेसाठी यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खूप समाधानी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 2 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडणार असल्याचा प्रश्न विचारला असता ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
हे वाचा - 'माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबध', विद्या चव्हाणांचा धक्कादायक आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Maharashtra, Mumbai