मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'आता सगळे चिडीचूप कसे आहेत?'

'आता सगळे चिडीचूप कसे आहेत?'

सामना अग्रलेखातून आज स्थानिक भूमीपूत्रांच्या न्याय हक्कांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखातून आज स्थानिक भूमीपूत्रांच्या न्याय हक्कांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखातून आज स्थानिक भूमीपूत्रांच्या न्याय हक्कांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत.

मुंबई, 21 ऑगस्ट : मध्यप्रदेश सरकारने स्थानिक भूमीपूत्रांना नोकऱ्या देण्याचा कायदा आला पण इतर राज्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. मात्र, महाराष्ट्रात स्थानिक भूमीपूत्रांच्या प्रश्नांना प्राधान्यं दिलं तर इतर राज्यांना राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. ही उचकी आता मध्य प्रदेश सरकारने स्थानिक भूमीपूत्रांसाठी केलेल्या कायद्यावेळी गायब झाली आहे. इतर राज्यांच्या या दूहेरी वागण्यावर सामना अग्रलेखातून आज प्रहार करण्यात आला आहे. सामना अग्रलेखातून आज स्थानिक भूमीपूत्रांच्या न्याय हक्कांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात आगामी काळात नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यात उपलब्ध असलेल्या सरकारी नोकरीत राज्यातील लोकांना प्राधान्य देण्यात येईल किंवा फक्त राज्यातीलच तरुणांना सरकारी नोकर्‍या मिळवण्याचा हक्क असेल अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. यावर आज सामनातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, काँग्रेसमध्ये खळबळ काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात? 'मध्य प्रदेशात स्थानिकांना नोकऱ्य़ा देण्याचा कायदा आला, तरी दिल्लीसह देशातील राष्ट्रीय एकात्मतावाल्यांचे मन अद्याप डचमळून कसे आले नाही? महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याचा विचार समोर आला, त्या प्रत्येक वेळी एकात्मतेचे सर्वपक्षीय ठेकेदार हे संसदेपासून राज्याराज्यांतील विधानसभेत महाराष्ट्राच्या नावाने ठणाणा करीत उभे राहिले. प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत? हा दुजाभाव शिवरायांच्या महाराष्ट्राला नेहमीच सहन करावा लागला. काही हरकत नाही, चालू द्या हे खेळ! भूमिपुत्रांनाच रोजगारात प्राधान्य ही चळवळ शिवसेनेने सुरू केली. 50 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विचारांची ठिणगी टाकली तेव्हा देशात काय गहजब उडाला होता! प्रांतीयवादी, जातीयवादी, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी अशी एक ना हजार दूषणे शिवसेनाप्रमुखांना देण्यात आली, पण शिवसेनेने भूमिपुत्रांबाबतची आपली ठाम भूमिका सोडली नाही. त्याचे फळ मराठी माणसाला शेवटी मिळालेच.' मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा 'कोरोनामुळे देशभरात बेरोजगारीचा स्फोट झाला आहे. 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पर्यटन, वाहतूक उद्योग ठप्पच आहे. अशा वेळी स्थानिकांसमोरचे रोजगाराचे संकट कायम आहे. सिने-नाट्य उद्योग बंद पडला आहे. मंदिरे बंद असल्याने पुजारी, कीर्तन, भजन करून गुजराण करणारे, मंदिराबाहेर हार, फुले, नारळ, प्रसाद विकून घरदार चालविणारेही अडचणीतच सापडले आहेत. हे सर्व विषय तसे राष्ट्रीय एकात्मतेचेच आहेत. प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा.'
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या