S M L

नरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेच्या वेळी जे मुद्दे उपस्थित केले त्यात तथ्य असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.

Updated On: Jul 20, 2018 03:50 PM IST

नरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

नवी दिल्ली,ता. 20 जुलै : राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेच्या वेळी जे मुद्दे उपस्थित केले त्यात तथ्य असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आपल्या भाषणात मांडले होते त्यामुळे या मुद्यांवर शिवसेनेचा राहुल गांधींना पाठिंबा आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. भाजप आणि शिवसेनेच्या वादावर अडसूळांचं हे वक्तव्य महत्वाचं समजलं जातं. अविश्वास प्रस्तावावर भाषणं सुरू असताना सर्वांच्या नजरा होत्या त्या राहुल गांधींच्या भाषणाकडे. राहुलने जोरदार फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, जातीयवाद, महिलांवरचे अत्याचार असे सगळे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. त्यांच्या अनेक मुद्यांवरून वाद आणि गोंधळही झाला. अध्यक्षांना एकदा कामकाज तहकूबही करावं लागलं.

कामकाज सुरू झाल्यानंतर राहुल गांधींनी प्रेम आणि व्देषाचा मुद्दा उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली मात्र त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मात्र माझ्याबद्दल तुमच्या मनात व्देष भरला आहे. कमालीचा व्देष भरला आहे. असं म्हणत राहुल गांधी आपल्या आसनावरून चालत पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीनं सर्व सभागृह आश्चर्यचकीत झालं. राहुल काय करत आहेत ते मोदींनाही काही क्षण समजलच नाही. नंतर राहुल गांधी परत जाताना मोदींनी त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा हस्तांदोलन करत काही वाक्य ते बोलले. नंतर राहुल आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य होतं. त्यांनी काही सहकाऱ्यांना डोळाही मारला, काय कमाल केली असा भाव त्यांच्या चेहेऱ्यावर होता. राहुल गांधींच्या या धक्का तंत्राने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close