संजय राऊतांचा भाजपकडून निषेध, सर्व डॉक्टरांची मागावी जाहीर माफी

संजय राऊतांचा भाजपकडून निषेध, सर्व डॉक्टरांची मागावी जाहीर माफी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : डॉक्टरांपेक्षा पेक्षा कंपाउंडर बरे असं बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राऊतांनी सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केले की, डॉक्टरांपेक्षा कंपाउंडर बरे, या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला आहे. आज कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असताना देखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या सुरू, आमदारांचा गंभीर आरोप

ते पुढे म्हणाले की, डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहे, त्यांचे गत अनेक महिन्यांपासून पगार करण्यात आले नसून तरी देखील सुद्धा ते एक मिशन व सेवा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना स्फूर्ती किंवा शाबासकीची थाप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेले हे बेताल वक्तव्य डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे असून अपमानजनक आहे.

मुंबईकरांनो Weather Alert नक्की वाचा, येत्या बुधवारपर्यंत अशी आहे पावसाची स्थिती

भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्व पदाधिकारी डॉक्टर्स अशी मागणी व आवाहन करतो की खासदार संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी. या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करीत आहोत असं भाजपकडून म्हटलं गेलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 16, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या