नवी दिल्ली, 2 डिसेंबर : "आम्ही महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीनुसार एका महिलेचा सन्मान ठेवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं स्वागत केलं. भाजप अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) बद्दल कशी वागली ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे भाजपने (BJP) आम्हाला शिकवू नये", असा घणाघात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला. केंद्र सरकार राज्यांसोबत हुकूमशाह सारखं वागतं, असाही आरोप त्यांनी केला आहे. भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत आल्या होत्या. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांचं ट्रायडेंट हॉटेलमध्ये जाऊन स्वागत केलं होतं. मुख्यमंत्री रुग्णालयात असल्याने त्यांची ममता बॅनर्जींसोबत भेट होऊ शकली नाही. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलं.
"कंगना रनौतचं तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं त्यापेक्षा हे स्वागत नक्कीच चांगलं आहे. कुणाचं आणि कोणत्या विषयासाठी स्वागत करावं हे महत्त्वाचं आहे. ममता बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. ज्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवलंय. विशेष म्हणजे भाजप प्रचंड मोठ्या ताकदीने उतरला असताना सुद्धा इतकं मोठं यश त्यांनी संपादीत केलं", असं अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा : देशातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर
"लाल-बाल-पाल अशी आमची स्वतंत्र चळवळीतील जुनं नाते आहेत. अशापद्धतीने एखादी महिला राज्याची मुख्यमंत्री, यशस्वी महिला धाडसी महिला राज्यात येते त्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं याचं दु:ख होणं हे मला आश्चर्यकारक वाटतं. तुम्हाला कंगना रनौतच्या स्वागताला वाईट वाटायला हवं होतं", असा टोला सावंत यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा : केंद्राच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने विमान प्रवासाचे नियम बदलले
"केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं. मुंबईत कोरोनाचा संसर्ग जास्त होता. मुंबईत घनदाट वस्तीच्या झोपड्या आहेत. त्यामुळे त्या घनवस्तीत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीने धारावी, कोळीवाडा, कुलाबा अशा अनेक भागांमध्ये जे काम केलं त्याचं कौतुक जगभरात झालं. आजही संसदेत आमच्यावतीने हा विषय चर्चेत घेतला. आमचे गटनेते विनायक राऊत यांनी हा विषय मांडला. त्यात त्यांनी खूप छान माहिती दिली. तुम्ही लसी देताना कशाप्रकारे कमी-जास्त प्रमाणात दिलं हे सुद्धा सांगितलं", अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.