ज्याचं कोणी नाही त्याची शिवसेना! बेवारस मृतदेहावर आमदारानं केले अंत्यसंस्कार, दिला मुखाग्नी

ज्याचं कोणी नाही त्याची शिवसेना! बेवारस मृतदेहावर आमदारानं केले अंत्यसंस्कार, दिला मुखाग्नी

लताबाई यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. कोणीही तो घेण्यासाठी आलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले.

  • Share this:

औरंगाबाद, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देश लॉक़डाऊन आहे. अनेक लोक घरात अडकून पडले आहेत. अशात औरंगाबादमध्ये एका लताबाई नावाच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. लताबाई यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. कोणीही तो घेण्यासाठी आलं नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर मुखाग्नीही दिला.

या घटनेसंबंधी अंबादास दानवे यांनी एक ट्वीटही शेअर केलं आहे. त्यामध्ये 'ज्याचे कोणी नाही त्याची शिवसेना. अंत्योदय योजनेच्या माध्यमातून सुपारी हनुमान येथे राहणाऱ्या एका वृद्धेवर जड मनाने अंत्यसंस्कार केले. हा या योजनेतील 176 वा अंत्यविधी होता. #संभाजीनगर' असं लिहिण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई यांना दोन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना नजिकच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानंतर 24 तास मृतदेह रुग्णालयात पडून होता पण कोणीही नातेवाईक आलं नाही. यानंतर लताबाई यांचा मृतदेह बेवारस म्हणून घोषित केला गेला.

ही घटना शिवसेनेचे सोमनाथ बोंबले व इतर कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतक शिवसैनिकांनी नियमांची पूर्तता करत लताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर आमदार अंबादास दानवे यांनी अंत्यसंस्कार केले.

First published: April 28, 2020, 12:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या