जळगाव, 10 जून : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यात नुकतीच दिल्लीमध्ये भेट झाली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut)यांनी गुरुवारी म्हटलं की, मोदी देश आणि भाजपचे प्रमुख नेते आहेत. आरएसएस (RSS)विधानसभा निवडणुकीत राज्यातील नेत्यांनाच चेहरा बनवण्याचा विचार करत आहे, त्यामुळं मोदींची लोकप्रियता घटली असं वाटतं का, असं त्यांना विचारण्यात आलं होते.
(वाचा-पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर पहिल्यांदाच बोलले शरद पवार, म्हणाले..)
या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मला यावर खरं तर प्रतिक्रिया द्यायची नाही. मी मीडियामधल्या बातम्या पाहिलेल्या नाहीत. याबाबत कोणी अधिकृत बोललेलंही नाही. गेल्या सात वर्षातल्या भाजपच्या यशाचं श्रेय मोदींना आहे. ते अजूनही त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत.
(वाचा-'...न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली', सेनेचा भाजपवर टीकेचा बाण)
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, शिवसेनेचं मत कायम हेच राहिलं आहे की, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात. त्यामुळं त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायलाच नको. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेवर दबाव येत असतो.''
चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यातही नुकतीच तूतू-मैमै झालेली पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी ठरवलं तर त्यांचा पक्ष वाघाशी मैत्री करू शकतो असं म्हटलं होतं. त्यावर वाघाशी कोणी दोस्ती करू शकत नाही. कोणाशी दोस्ती करायची हे वाघ ठरवत असतो, असं राऊत म्हणाले होते. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंबा मिळावा म्हणून राऊत सध्या भेटी-गाठी घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.