पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेबद्दल नीलम गोऱ्हेंनी केलं सूचक वक्तव्य

पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेबद्दल नीलम गोऱ्हेंनी केलं सूचक वक्तव्य

पंकजा मुंडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 3 डिसेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा राज्यभर जोर धरू लागली आहे. पंकजा मुंडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत आता शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे.

'पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या कुटुंबासोबत आमचे राजकारणापलीकडचे नाते आहे. मुंडे कुटुंबासोबत वेगळा संवाद आहे. पंकजा यांच्याविरोधात शिवसेनेनं उमेदवारही दिला नव्हता. 12 डिसेंबरला अजून नऊ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत वेट अँड वॉच,' असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेची शरद पवारांवर स्तुतीसुमने

नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केलं आहे. 'आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे 5 वर्षे राहतील. शरद पवार यांची वडीलकीची भूमिका आहे', असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे:

- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे आता पुण्याच्या टेकड्या नक्की वाचतील

- हे सरकार दाऊदलाही क्लीन चिट देईल या टीकेवर- दाऊदला परत आणणे हे केंद्र सरकारचे काम, राज्य सरकार या बाबत सर्व मदत करेल

- बुलेट ट्रेन किंवा नाणार या सारख्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असेल, लोकांचा विरोध असेल तर आढावा घेऊन अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील

First published: December 3, 2019, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading