मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आम्ही पण आंदोलन करणार'

'शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आम्ही पण आंदोलन करणार'

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मुंबई, 20 सप्टेंबर : 'शिवसेना आतापर्यंत आंदोलन करुनच मोठी झाली आहे. मग आम्ही आंदोलन करतोय तर त्याला आक्षेप का?' असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचारला आहे. ठाकरे यांनी मराठा समाजाच्या भावना आणि आंदोलकांच्या भावना सारख्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाकरता आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता मराठा क्रांती मोर्चातर्फे उत्तर देण्यात आलं आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. राज्यात एकीकडे कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. मराठ समाज आक्रमक होत अनेक ठिकाणी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अशात आज मराठा समाजाने आज मुंबईच मोर्चा वळवला आहे. मुंबईत दादर इथल्या प्लाझा थिएटरबाहेर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या आंदोलन सुरू आहे. Weather Alert: पुढच्या 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत आज 20-25 ठिकाणी आंदोलन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मुंबईत मराठा समाज आक्रमक, थेट प्लाझा थिएटरबाहेर करणार ठिय्या आंदोलन ठाकरे सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने नसल्याची टीका करत मराठा समाज आणि विरोधकांकडून जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर, मराठा समाजामध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ मराठा समाजाचा हा मतदानासाठी वापर का, असा प्रश्न तरुणांकडून विचारला जाऊ लागला आहे. अशात हिंगोली जिल्ह्यात तर अनेक गावांमध्ये, थेट राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली असून गावाच्या बाहेरच बोर्ड लावून, गावात न येण्याचा इशारा, राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना देण्यात आला. एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर त्यामुळेच मराठा समाज आता अधिक आक्रमक झाला असून, पुढाऱ्यांना गावात येणे पासूनच मज्जाव केला जावू लागला आहे. सोबतच गावात आल्यास, "आपल्या जीविताला धोका झाल्यास, स्वतः जबाबदार" असल्याचा इशाराही मराठा समाजाला दिला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या