Home /News /news /

यंदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावर आवाज घुमणार का? शिवसेनेनं केले स्पष्ट

यंदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावर आवाज घुमणार का? शिवसेनेनं केले स्पष्ट

दरवर्षी लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो

    मुंबई, 02 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिलाच दसरा मेळावा येत आहे. पण, शिवसेनेनं कोरोनाच्या परिस्थितीमुळे दसरा मेळावा घेण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून यंदा दसरा मेळावा होणार आहे की नाही, याबद्दल स्पष्ट करण्यात आले आहे. 'आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे' असं शिवसेनेनं स्पष्ट केले आहे. अमोल कोल्हे यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले खडेबोल, म्हणाले... 'दरवर्षी लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही' असंही सेनेनं स्पष्ट केले आहे. पण सोयीस्कर मौन आणि...,गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला 'अनलॉक-5 मुळे लोकांचे जनजीवन थोडे तरी रुळावर यावे अशी अपेक्षा आहे. नोकरीधंद्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था ठेवा बाजूला, सामान्यांची, मध्यमवर्गीयांची तोळामासाची अर्थव्यवस्थाही मातीमोल झाली आहे. सर्वत्र अंधकार आणि निराशा आहे. त्या निराशेतून लोकांना बाहेर काढले नाही, तर महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेस गालबोट लागेल' अशी चिंताही सेनेनं व्यक्त केली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून राज्यात शिवसेनेचं सरकार येईल आणि सेनेचाच मुख्यमंत्री होईल, असं आश्वासन शिवसैनिकांना दिले होते. अखेर आता शिवसेनेचं सरकार आहे आणि मुख्यमंत्रीही सेनेचाच आहे. त्यामुळेच यंदाचा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहता सेनेनं दसरा मेळाव्याबद्दल अंधातरी असल्याचे सांगितले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या